Harshvardhan Patil- Devendra Fadnavis | हर्षवर्धन पाटलांचा लेटरबाँब, थेट फडणवीसांना लिहिलं पत्र, आपल्या मित्रपक्षाचे लोक मला धमकी…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Harshvardhan Patil- Devendra Fadnavis | आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ यंदा नणंद-भावजयीच्या संभाव्य लढतीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. याच मतदार संघातील इंदापूरचे (Indapur) माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. (Baramati Lok Sabha)

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे.(Harshvardhan Patil- Devendra Fadnavis)

परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्त्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

पत्रात पुढे म्हटले आहे की, तालुक्यामध्ये फिरु न देण्याची धमकी ते देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश घेऊन सहकार्य करावे ही विनंती.

विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात मित्रपक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव लिहिलेले नाही.
परंतु, सुत्रांच्या माहितीनुसार, पाटलांचा रोख इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडे आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या
नेत्यांमध्ये संदोपसुंदी दिसून येत असल्याने त्याचा फटका महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा यांना बसू शकतो,
अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर, हरवलेली मुलगी तासाभरात आईच्या कुशीत सुखरूप

Uddhav Thackeray On BJP | भाजपाच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचारी नेत्याचं नाव, पण निष्ठावंत गडकरींना टाळलं,
उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक