‘कोरोना’ पॉझिटिव्ह ‘कैदी’ रुग्णालयातून PPE किट घालून ‘फरार’, घटना CCTV त कैद (व्हिडीओ)

जींद/हरयाणा : वृत्तसंस्था – कोरोनावर उपचार घेणाऱ्या कैद्याने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना हरयाणातील जींद रुग्णालयात घडली आहे. हा कैदी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर जींदमधील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


जिंदचे पोलीस उपायुक्त धरमबीर सिंह यांनी सांगितले की, फरार आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आम्ही आमची सुरक्षा काढून घेतली. यानंतर आरोपीने रुग्णालयाच्या आयसोलेशन केंद्राच्या खोलीतील खिडकी तेडली आणि पीपीई किट घालून पळून गेला.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जींद जिल्ह्यातील जूलना वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सहा महिन्यांच्या वासरावर अनैसगर्गिक लैंगिक कृत्य केल्याचा आरोप या युवकावर आहे. याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयातील आयसोलशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळावीर संध्याकाळी तो पीपीई किट घालून रुग्णालयातून पळून गेला.

कोरोनाचा रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याची माहिती मिळताच रुग्णालयात खळबळ उडाली. पोलिसांनी सांगितले की, तरुणाचा कोरोनाचा नमुना घेण्यात आला होता आणि तो पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारीच त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला. सायंकाळी सहाच्या सुरमारास तो पळून गेला. हा तरूण पळून जातानाची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याने पीपीई किट घालून बाथरुममध्ये जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने बाथरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून फरार झाला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हरयाणात कोरोनाचे 5 हजारापेक्षा अधिक रुग्ण
हरयाणामध्ये मंगळवारी कोरोनाचे 355 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5209 इतकी झाली आहे. तर 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1807 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील 22 जिल्हे कोरोनाच्या विळख्यात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे.