Hasan Mushrif | जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडेच थांबले…., हसन मुश्रीफांचे वक्तव्य चर्चेत, ‘ती’ घटना कोणती?

मुंबई : Hasan Mushrif | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पाडली आणि ते समर्थक आमदारांसोबत सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक मोठे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अतिशय विश्वासू मानले जाते होते, त्यापैकीच काही नावे म्हणजे हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) इत्यादी. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) सुद्धा अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा यापूर्वी झाली होती. आता याबाबत मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आज पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती.
आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान
ठेवणे आणि त्यांच्यासाठी जीवाचे रान करणे हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हे आमचे काम आहे, कर्तव्य आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना
सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमुल्ये पाळणारा माणूस आहे.

दरम्यान, ती घटना कोणती? ज्यामुळे जयंत पाटील अजित पवार गटात (Ajit Pawar Group) जाऊन शपथ घेणार
असताना देखील थांबले, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मेट्रो कामगारांचे अपहरण करुन रोकड लुटली, पुण्यातील घटना

Lalit Patil Drug Case | तातडीची शस्त्रक्रिया सांगितली असताना ललित पाटील 10 दिवस वेगवेगळ्या शहरात कसा फिरत होता?, रविंद्र धंगेकरांचा सवाल