सवतीसोबत मिळून पहिली पत्नी व तिच्या मुलीचा छळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करून दुसऱ्या पत्नीसोबत मिळून पहिल्या पत्नीचा व तिच्या मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती पत्नीवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४० वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. २००६ पासून सुरु असलेला हा प्रकार आता समोर आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि संबंधित महिलेचे २० -२१ वर्षांपूर्वी ठरवून लग्न झाले आहे़. लग्नानंतर ते पुण्यात राहायला आले. त्यांना एक मुलगीही झाली़. मात्र कामानिमित्त ओळख झालेलया एका महिलेसोबत पतीचे प्रेमसंबंध जुळले. हा प्रकार समजल्यावर दोघात वाद सुरु झाले. मात्र त्यावेळी पतीने तिला मारहाण करून माहेरी पाठवविले. काही दिवसांनी ती परत आली. तेव्हा त्याने दुसरे लग्न केले असल्याचे समोर आले. पहिल्या पत्नीला दुसरीशी जुळवून घेण्यास त्याने सांगितले.

त्यानंतर पती आणि सवती यांच्याकडून त्रास दिला जाऊ लागला. त्यामुळे तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या दरम्यान, दुसऱ्या पत्नीलाही दोन मुली झाल्या़. तेव्हा २०१६ मध्ये पती व सवतीने आम्हाला तुझा त्रास होतो, तू येथून निघून जा असे म्हणत वाद घातला़. या कारणावरून तिने विषारी औषध घेतले़ त्यावर उपचारानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली़. त्यात त्यांच्या समझोताही झाला़. तिला पतीकडून घरखर्च देण्याचे ठरले़. मात्र काही महिन्यांनी पतीने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली़. मागील महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी तिने पतीला गोळ्या घेऊन येण्यास सांगितले़. त्यावर त्याने घरी येऊन मुलीला व तिला शिवीगाळ करत मारहाण केली व जीव मारण्याची धमकी दिली़. त्यामुळे महिलेने पती व सवतीविरुद्ध फिर्याद दिली आहे़