हवेलीत आज 224 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –   हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून या रोगातून मुक्त होणार्याची संख्या मोठी आहे आज या आजारावर मात करुन तब्बल 224 जण घरी परतले असून बरे होण्याचा दर 92 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हवेलीचे आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे तरीही काही मोठ्या लोकसंख्येच्या गावात आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार 93 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असली तरीही 224 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.सध्या तालुक्यात 661 एक्टीव रुग्ण असून वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 11288 वर पोहोचली आहे यातून 10390 रुग्ण बरे झाले आहेत.आज सर्वाधिक 29 रुग्ण उरुळी कांचन येथे आढळून आले आहेत.