हवेलीची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती : आमदार अशोक पवार

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यातील शेतकर्याच्या शेतीमालासाठी पुणे मार्केटयार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडात सर्वात मोठी संस्था, या समितीवर गेली सोळा वर्षे प्रशासक नियुक्ती होते व ही संस्था काही काळ विभागीय तर काही काळ जिल्हा पातळीवरील तर काही काळ केंद्रीय पातळीवर होतो तर सध्या हवेली व मुळशी या दोन तालुक्यातील एकत्रित संस्था अस्तित्वात होती विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हवेलीची स्वतंत्र बाजार समिती व्हावी म्हणून विधानसभेच्या पहील्याच बैठकीत प्रश्न उपस्थित केला व याचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला तर आमदार संग्राम थोपटे यांनी ही मुळशी तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती व्हावी म्हणून मागणी केली आमदार अशोक पवार यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या मागणीला त्यांचीही संमती मिळवली.

हवेली तालुका बाजार समितीचा प्रस्ताव राज्याच्या सहकार मंत्र्याकडे सर्व कायदेशीर पुर्तता करुन दाखल केला व कायदेशीर बाबीची पुर्तता करुन अधिकृतरित्या हवेली तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आली असल्याने हवेली तालुक्यातील लोकनियुक्त संचालक मंडळ यावर अस्तित्वात येईल विधानसभा निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यातील शेतकर्याना हक्काची बाजार समिती मिळऊन देईल असे आश्वासन दिले होते तर या आश्वासनाची पुर्तता आमदार अशोक पवार यांनी तात्काळ केल्याने हवेली तालुक्यातील शेतकर्यानी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे गुलटेकडी येथील हवेली मुळशी विभागीय असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती झाल्याचे पुणे जिल्ह्याचे सहकार विभागाचे सहनिबंधक यांनी जाहीर केले यामुळे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

हवेली तालुक्यातील शेतकर्याची असलेली हक्काची कृषी उत्पन्न बाजार समिती ही फक्त हवेली तालुक्याचीच ठेवावी अशी आग्रही मागणी व पाठपुरावा आमदार अशोक पवार यांनी अविरतपणे सुरू ठेवला होता अखेर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे तर सर्व कायदेशीर पुर्तता झाल्यानंतर सहकार विभागाचे सहनिबंधकाने शिक्कामोर्तब केल्याने गेली सोळा वर्ष प्रलंबित असलेला हवेली तालुक्यातील शेतकर्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील शेतकर्यांना त्यांची हक्काची बाजार समिती पुर्वी प्रमाणे अस्तित्वात येण्याचे आश्वासन दिले होते व पहील्याच अधिवेशनात हवेली बाजार समितीचा प्रश्न ऊपस्थीतीत करुन स्वतंत्र बाजार समितीसाठी पाठपुरावा केला याकामी ऊपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार्य केले व हवेली तालुक्यातील शेतकर्यांना त्यांच्या हक्काची बाजार समिती दिल्याचे समाधान झाले असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले