29 फेब्रुवारी पासून बंद होणार HDFC चं हे App, बँकेकडून ग्राहकांना केलं जातय ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण एचडीएफसी बँकेचे ग्राहक असल्यास आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्राहकांना एक संदेश पाठवत आहे. या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, एचडीएफसी बँकेचे जुने अ‍ॅप 29 फेब्रुवारीला बंद होईल. म्हणजेच या अ‍ॅपद्वारे ग्राहक पैसे हस्तांतरित करू शकणार नाहीत किंवा अन्य बँकिंग सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम राहणार नाहीत. अशा परिस्थितीत अ‍ॅप बंद झाल्यास आपण काय करावे? जाणून घ्या यासंदर्भात…

आपल्याकडे जुने एचडीएफसी बँक अ‍ॅप असल्यास प्रथम Google Play Store वर जा. येथून बँकेचे नवीन मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा. आपण हे अ‍ॅप विनामूल्य डाउनलोड करू शकता. बँकेच्या अ‍ॅपची नवीन आवृत्ती गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. बँकेचा दावा आहे की हे, नवीन अ‍ॅप आधीपासूनच बरीच सुरक्षा आणि वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. ग्राहकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठीही बँकेने एक लिंक दिली आहे.

दरम्यान, शेड्युल मॅनेजमेंटमुळे एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, फोन बँकिंग आणि आयव्हीआर वरील क्रेडिट कार्ड सेवा 18 जानेवारी 2020 रोजी रात्री 1 ते दुपारी 12 या वेळेत बंद ठेवण्यात आले. या संदर्भात बँकेने यापूर्वीच ग्राहकांना सतर्क केले होते. त्याच वेळी, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सर्व्हिसमध्ये बरीच गडबड पाहायला मिळाली. ज्यामुळे ग्राहकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले.