HDFC Bank Loan | एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले! हप्त्याचा बोजा वाढणार

पोलीसनामा ऑलाइन टीम – HDFC Bank Loan | खासगी क्षेत्रातील अग्रणी असलेल्या एचडीएफसी (HDFC Bank Loan) बँकेने विविध मुदतीच्या फंड आधारित कर्ज दरात (MCLR) 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन दरवाढ बुधवारपासून (दि. 7 जून) लागू झाली आहे. यामुळे बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवर हप्त्यांचा बोजा वाढणार आहे. (HDFC Bank Loan Costlier Your EMI Will Increase)

 

एचडीएफसी बँकेचे ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर 9.05 टक्क्यांवर गेला आहे. तसेच एका दिवसासाठी 8.10 टक्के, तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे 8.50 टक्के आणि 8.85 टक्के झाला आहे. त्याचबरोबर तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता 9.20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. (Rate Of Interest Increase)

दरम्यान, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (Repo Rate) 2.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. तो आता 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र एप्रिल 2023 मध्ये पार पडलेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला विराम दिला. आता पुन्हा एकदा व्याजदर जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. परिणामी, कर्जदारांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना, एचडीएफसी बँकेने मात्र वेगळा मार्ग पत्करल्याचे दिसते.

 

Advt.

Web Title :  HDFC Bank Loan Costlier Your EMI Will Increase Rate Of Interest Increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा