Maharashtra Politics News | ‘सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा…’, शरद पवार यांच्यानंतर राऊत बंधूंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोळकर होणार’ अशी धमकी ट्विटद्वारे शरद पवारांना दिली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra Politics News) ‘सकाळची पत्रकार परिषद (Press Conference) बंद करा, अन्यथा गोळ्या घालू’, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.

 

सुनील राऊत म्हणाले, गुरुवारी (दि.8) 4 ते 4.15 दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. (Maharashtra Politics News) महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू, सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारु, अशी धमकी दिल्याचे राऊतांनी सांगितलं.

 

संजय राऊतांना मारण्याची सुपारी…

गेले अनेक दिवस झाले, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारला त्याची जाणीव करुन दिली आहे.
मात्र, सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. महाविकस आघाडीचे (Mahavikas Aghadi)
प्रमुख नेते संजय राऊत यांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचं वाटतं, असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी
एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला.

 

जर काही झालं, तर त्याची जबाबदारी

Advt.

मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय.
जर काही झालं, तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल,
असा इशारा सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकार (Central Government)
आणि राज्य सरकारला (State Government) दिला आहे.

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा