भारताचा ‘हा’ असा एकमेव ‘फलंदाज’ आहे, ज्यानं वनडेमध्ये ‘पळून’ पूर्ण केल्या 100 धावा

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकारांची एक वेगळीच मजा असते. आज कुठल्याही चाहत्याला चौकार किंवा षटकारांशिवाय सामने पहायला आवडत नाहीत, म्हणून प्रत्येक खेळाडू चौकार आणि षटकार मारून आपल्या फलंदाजीचा आनंद लुटणे पसंत करतात. विशेष म्हणजे टी20 क्रिकेट सुरू झाल्यापासून तर फलंदाजांमध्ये चौकार आणि षटकारांची शर्यत पाहायला मिळते.

फलंदाज एकदिवसीय सामन्यात चौकार आणि षटकार मारून करतात अनेक धावा तसे तर फलंदाज पळून बरेच रन करतात, पण डावात चौकार आणि षटकारांनी अधिक धावा करतात. एकदिवसीय क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर असे बरेच फलंदाज आहेत जे पळून बऱ्याच धावा करतांना दिसतात. वनडे फॉर्मेटमध्ये बहुतेक फलंदाज चौकार आणि षटकारांव्यतिरिक्त काहीच धावा पळून काढण्यावर विश्वास ठेवतात, पण असे देखील बरेच फलंदाज आहेत, जे विकेट्सदरम्यान धाव घेण्याची क्षमता ठेवतात. अशा खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांसारख्या फलंदाजांना तोड नाही.

एकदिवसीय सामन्यात कोहलीने फक्त पळूनच काढल्या 100 धावा
एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे म्हणजेच 100 धावा काढणे ही फलंदाजासाठी एक मोठी उपलब्धी मानली जाते, अशातच जर एखादा फलंदाज एकाच सामन्यात 100 धावा विकेट्स दरम्यान पळून काढू शकतो तर हे आश्चर्य वाटण्यापेक्षा कमी म्हणता येणार नाही. एका भारतीय खेळाडूने भारतीय क्रिकेट संघासाठी हे काम केले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या एकाच सामन्यात 100 रन तर 1, 2 आणि 3 धावा करतच बनविले आहेत. भारताचे हे एकमेव फलंदाज आहेत विराट कोहली, ज्यांनी एकदिवसीय सामन्यात 100 धावा तर पळूनच काढल्या आहेत.

विराट कोहलीने केली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही आश्चर्यकारक कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 100 धावा फक्त पळून केल्या आहेत. त्या सामन्यात विराट कोहलीने 160 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. या खेळीदरम्यान ते मैदानात बऱ्याच धावा पळून काढताना दिसले होते. विराट कोहलीने सुरुवातीपासूनच विकेट्स दरम्यान पळून धावा करण्यास रस दाखवला. त्यांनी या सामन्यात 1,2 आणि 3 अशा धावा घेत एकूण 100 रन पूर्ण केले. भारतासाठी असे करणारे ते एकमेव फलंदाज आहेत. तसे, एकदिवसीय सामन्यात पळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनच्या नावावर आहे, त्यांनी युएईच्या विरुद्ध 188 धावांच्या खेळीत 112 धावा पळून काढल्या होत्या.