Breathe Control Tips : धावताना जास्त धाप लागत असेल तर ‘या’ 6 टिप्स अजमावून पहा, ब्रिथिंग होईल कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रनिंग बेस्ट कार्डियो एक्सरसाईज आहे, जी निरोगी राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. काही लाक धावायला घाबरतात कारण धावताना जास्त धाप लागते. असे तर रनिंग करताना धाप लागणे सामान्य गोष्ट आहे, कारण त्यावेळी हार्ट वेगाने पम्प होते आणि बॉडीची ऑक्सीजनची आवश्यकता वाढते.

या दरम्यान हार्टबीट दिडपट वाढतात आणि कधी-कधी हा आकडा 100-130 प्रति मिनिटांपर्यंत सुद्धा पोहचतो. या दरम्यान खुप त्रासाचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला सुद्धा धाप लागण्याची भिती वाटत असल्याने रनिंग करत नसाल, घाबरू नका. आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्हाला कमी धाप लागेल.

1 बॉडी वॉर्मअप करा :
रनिंग करण्यापूर्वी बॉडीला वॉर्म-अप आवश्य करा. वॉर्म-अप केल्याने रनिंग करताना धाप लागण्याची समस्या होणार नाही.

2 श्वास घेण्याची पद्धत योग्य करा :
एक्सरसाईज करताना श्वास घेण्याचा पॅटर्न योग्य असायला हवा. तुम्ही नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा.

3 रनिंगपूर्वी ब्रिथिंग एक्सरसाईज करा :
रनिंग करण्यापूर्वी श्वासाची एक्सरसाईज आवश्य करा, जेणेकरून ऑक्सीजन योग्य प्रमाणात तुमच्या फुफ्फुसात जाऊ शकतो. ब्रिथिंग एक्सरसाईज करण्याने तुमची फुफ्फुसे योग्य प्रकारे काम करतात.

4 तोंडाने श्वास घेऊ नका :
बहुतांश लोक रनिंग करताना जास्त श्वास घेण्याच्या नादात तोंडाने श्वास घेण्यास सुरूवात करतात. ज्यामुळे लवकर थकवा येतो. यासाठी नेहमी नाकाने श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेण्याच्या दरम्यान नेहमी लक्षात ठेवा की खोल आणि दिर्घ श्वास घ्या, जेणेकरून ब्रिथिंगची प्रक्रिया योग्य प्रकारे चालू शकेल आणि लवकर थकणार नाही.

5 योगा, प्राणायाम सुद्धा लाभदायक :
रोज एक तास सायकल चालवून एक वर्षात पाच किलो वजन कमी करू शकता. धाप लागण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता. योगा केल्याने ब्रिथिंगमध्ये सुधारणा होते आणि धाप लागण्याची समस्या दूर होऊ शकते.

6 रनिंगमध्ये वॉकब्रेक घ्या :
रनिंग करताना धाप जास्त लागते अशावेळी 5 मिनिटांसाठी धावा आणि पुन्हा 1 मिनिटांसाठी ब्रेक घ्या आणि पुन्हा धावा. ब्रेक घेऊन धावल्याने तुम्हाला कमी धाप लागेल.