‘हेल्थ’ आणि ‘फिटनेस’च्या यादीमध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं अ‍ॅप बनलं ‘आरोग्य सेतू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीव्ही आणि इंटरनेटवर कोरोनाची माहिती प्रत्येक वेळी सांगितली जात आहे, पण कोविड-१९ च्या संसर्गाचा प्रसार, जोखीम, प्रतिबंध आणि उपचार यासाठी लोकांना अचूक माहिती देण्यासाठी सुरु केले गेलेले आरोग्य सेतु ऍप महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. भारताचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ऍप आरोग्य सेतू अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हींवर हेल्थ आणि फिटनेस अ‍ॅपच्या यादीत सर्वात जास्त डाउनलोड होणारा अ‍ॅप बनला आहे. २ एप्रिल ते २३ जून दरम्यान ‘Daily Downloads’ मध्ये ऍप प्रथम क्रमांकावर आहे.

अ‍ॅप अ‍ॅनालिटिक्स फर्म अ‍ॅप अ‍ॅनी (App Annie) च्या अहवालानुसार, कोरोना विषाणू रोखण्यासाठी माहिती पुरवणारा सरकारी ऍप आरोग्य सेतु ऍप मेमध्ये देखील जगातील पहिल्या १० डाउनलोड केलेल्या मोबाइल अ‍ॅप्सपैकी एक होता, ज्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ट्विटद्वारे दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिल रोजी ऍप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते.

असे करते काम
आरोग्य सेतु ऍप ब्लूटूथ आणि जीपीएससह चालते. कोविड-१९ च्या संसर्गाचा प्रसार, जोखीम, प्रतिबंध आणि उपचारांसाठी लोकांना अचूक माहिती देण्यासाठी हे ऍप काम करेल असा सरकारचा दावा आहे. हे ऍप युजर्सना ब्लूटूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संक्रमण किंवा इतरांशी संपर्कात येण्याची माहिती देते. इतकेच नाही हे अ‍ॅप व्हायरसपासून बचाव करण्याच्या खबरदारीविषयी देखील मार्गदर्शन करते.

असा करा आरोग्य सेतू ऍपचा वापर
आपल्याला प्ले स्टोअरमध्ये हा अ‍ॅप सहज सापडेल. तो फोनमध्ये इन्स्टॉल करा. आपण इन्स्टॉल केल्यानंतर प्रथम ते उघडल्यास काही प्रश्न आणि उत्तरांसह परवानग्या द्याव्या लागतील. आपल्या मोबाइल नंबर, ब्ल्यूटूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने या ऍपला हे माहित होईल की, आपल्या आजूबाजूला संसर्ग होण्याचा धोका किती आहे आणि आपण त्यापासून किती सुरक्षित आहात.