Benefits Of Black Pepper : लठ्ठपणा कमी करण्यापासून हृदयारोगापर्यंत उपचार करते काळीमिरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काळीमिरी एक असा गरम मसाला आहे, ज्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. काळीमिरीचा वापर जेवणासह अनेक आजारातही केला जातो. काळीमिरीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे सूज कमी होते, सुर्दी, ताप आणि खोकल्यावरही परिणामकारक आहे. काळीमिरीच्या वापराने इम्यून सिस्टम बूस्ट होते, सोबतच हृदयरोग दूर ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

काळामिरीमध्ये पिपरीन नावाचे तत्व असल्याने तिची चव वेगळीच लागते. तिच्यात आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगेनीज, झिंक, क्रोमियम, व्हिटॅमिन सीए आणि सी आणि अन्य पोषक तत्व असतात.

हे आहेत फायदे

1 वजन कमी करणे

याच्या नियमित वापराने वजन नियंत्रणात राहाते. अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

2 पचनशक्ती

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे. अपचन, कफ, बद्धकोष्ठता दूर करते.

3 कँसर

काळीमिरी कँसरसारख्या गंभीर आजाराला दूर ठेवते. व्हिटॅमिन सीए, व्हिटॅमिन एए, फ्लॅवोनॉईड्स कारोटेन्स आणि अन्य अँटी-ऑक्सीडेंट असल्याने हे शक्य होते.

4 गॅसची समस्या

पोटात गॅस होत असेल तर काळीमिरी सेवन करावी. यामुळे गॅस तयार होत नाही आणि पोट ठीक राहाते.