Brain Power Improve Tips : जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल, तर ‘या’ पध्दतीनं करा ‘मेमरी शार्प’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याच्या काळातील मल्टिटास्किंग कार्याचा आपल्या स्मरणशक्तीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. आपण आपली महत्त्वाची कामे करणे विसरतो, आवश्यक वस्तू एका ठिकाणी ठेऊन त्यास विसरून जातो. तसा तर स्मरणशक्तीवर परिणाम हा वयानुसार (50 वर्षे) होत असतो. वाढत्या वयाबरोबरच बरेच आजारदेखील जडत असतात जसे की स्मृतिभ्रंश, यामध्ये स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. पण आजकाल लहान वयातच लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होत आहे. आपली एखाद्याशी भेट झाली तर त्यांच्याशी आपण चांगले संभाषण करतो परंतु त्यांचे नाव आपण विसरतो. जर तुमची स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल तर तणावात राहू नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांविषयी सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता. आज या पद्धतींबद्दल जाणून घेऊया…

मेंदू तेज करणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा

असे बरेच खाद्यपदार्थ आहेत जे आपल्या स्मरणशक्तीत सुधारणा करू शकतात कारण ते विशेष अँटिऑक्सिडेंट आणि जीवनसत्वांनी भरपूर असतात. आपल्या आहारात ग्रीन टी, ब्लूबेरी, कोबी, ब्रोकोली, फुलकोबी, डार्क चॉकलेट आणि हळदीचा समावेश करा. तज्ज्ञ म्हणतात की अगदी एक ग्लास रेड वाईनदेखील आपली स्मरणशक्ती वाढवू शकते.

अधिक झोप घ्या

मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी मेंदूला विश्रांती देणेदेखील आवश्यक आहे. आपल्याला पुरेशी झोप न मिळाल्यास आपण आपली स्मरणशक्ती गमावत राहाल आणि अनेक गोष्टी विसरायला सुरुवात कराल. त्यामुळे विश्रांती घ्या जेणेकरून आपण आपल्या मेंदूला सतर्क ठेऊ शकाल.

मानसिक व्यायाम करा

मेंदूला आव्हान देऊन आपण आपल्या मेंदूला गती देऊ शकता. जटिल संकल्पनांचा अभ्यास करून मनाची शक्ती वाढवता येते. शक्य तितके जास्त वाचन करा. वाचन हा एक मूलभूत प्रकारचा उत्तम मानसिक व्यायाम आहे. शब्दसंग्रह वाढवा, दररोज नवीन शब्द ज्ञात करून देणारे एखादे कॅलेंडर किंवा डिक्शनरीमधून शब्द शिका. यामुळे आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढेल.

व्यायाम करा

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या हृदयाची गती वाढते, ज्यामुळे आपल्या मेंदूत रक्तप्रवाह होतो, त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. धावणे, पोहणे, दुचाकी चालविणे यांसारखे किंवा कोणत्याही प्रकारचे व्यायाम कमीतकमी 30 मिनिटे केल्याने हिप्पोकॅम्पस वाढविण्यास मदत मिळते. हिप्पोकॅम्पसला ‘मेंदूचे स्मृती केंद्र’ मानले जाते. जर आपल्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल तर काही मिनिटे वॉक करा.

मल्टिटास्किंग वर्क टाळा

आरोग्य तज्ज्ञाच्या मते आजच्या काळात बर्‍याच लोकांना एकाच वेळी बहुतेक कामांची पूर्तता करावीशी वाटते. जर आपणही मल्टिटास्किंग असाल तर तुमची सवय बदला. ही सवय मेंदूसाठी अजिबात चांगली नाही. आपण एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करत असाल तर याचा अर्थ असा आहे की, आपला मेंदू एकाच वेळी बर्‍याच गोष्टींचे समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा परिस्थितीत तुमचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित नसते आणि मग तुम्हाला एखादी गोष्ट किंवा काम लक्षात ठेवणे खूप अवघड होते.

साखर कमी वापरा

तुम्हाला माहिती नसेल, पण तुमच्या आहाराचादेखील तुमच्या मेंदूवर परिणाम होत असतो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक आपल्या आहारात जास्त साखर वापरतात त्यांची स्मरणशक्ती कमी असते. म्हणूनच चांगल्या स्मरणशक्तीसाठी आपण साखरेच्या वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

एक नित्यक्रम तयार करा

आपण कोणतेही काम करण्यासाठी एक नित्यक्रम तयार करावा, जसे की आपण आपल्या ऑफिसचे काम करत असाल तर कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर किंवा ईमेलमध्ये एक फोल्डर तयार करा जिथे आपण आपले महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा महत्त्वाच्या गोष्टी सूचीबद्ध करू शकता. अशा परिस्थितीत आपल्याला काहीही शोधण्यात त्रास होणार नाही.