Covid-19 Treatment Cost : ‘कोरोना’ व्हायरसच्या रूग्णासाठी उपचाराचा खर्च किती महाग ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसच्या 80 टक्के रूग्णांचा उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये केला जात आहे. प्रत्यक्षात, मोठ-मोठी रूग्णालये कोरोनावर उपचार करण्यासाठी सक्षम आहेत, परंतु तेथे असेच लोक जात आहेत जे मोठा खर्च करू शकतात किंवा ज्यांना सरकारी रूग्णालयातून रेफर केले जाते.

किती आहे उपचाराचा खर्च?

कोरोना उपचाराचा खर्च हा आजाराची गंभीरता, रूग्णाचे वय आणि अन्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. कोविड-19 च्या सामान्य प्रकरणात उपचारासाठी किती खर्च येतो ते जाणून घेवूयात…

तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सीनियर डॉक्टरांच्या महितीनुसार, कोरोना व्हायरसच्या उपचारात जर व्हेंटीलेटर किंवा लाईफ सेव्हिंग मशीनचा उपयोग झाला नाही तर, प्रति दिवसाचा खर्च 20,000 ते 25,000 पर्यंत येऊ शकतो. याचा अर्थ असा की, 14 दिवसांच्या उपचाराचा खर्च 2,80,00 रुपयांपासून 3,50,000 पर्यंत येऊ शकतो.

अनेकदा, रूग्णांना त्यावेळी डिसचार्ज केले जाते, जेव्हा लागोपाठ त्यांच्या 5 चाचण्या निगेटीव्ह येतात. काही प्रकरणात योग्य परिणामासाठी 8 ते 10 टेस्ट सुद्धा केल्या जातात. बॉलीवुड सिंगर कनिका कपूर 6 टेस्टनंतर कोरोना व्हायरस निगेटीव्ह आढळली होती.

स्वॅब टेस्ट

सुप्रीम कोर्टाने प्रायव्हेट लॅब आणि एक्सपर्ट्सचे म्हणणे ऐकल्यानंतर कोरोना व्हायरसच्या स्वॅब टेस्टची किंमत 4500 रुपये ठरवली आहे. कोरोना व्हायरस टेस्ट किटची किंमत 3000 रूपये आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली तर त्यास हॉस्पिटलच्या अ‍ॅम्ब्युलन्सने घेऊन जातात. अनेकदा हॉस्पिटल सरकारी खर्चाने रूग्णाला घरून हॉस्पिटलमध्ये आणतात.

एकदा आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाल्यावर रूग्णासाठी काही नियम आहेत. प्रत्येक खोलीत एक स्वतंत्र शौचालय असावे आणि केवळ एकच बिछाणा असावा. जर रूग्ण वयस्क असेल आणि अन्य आजार असतील तर त्यास व्हेंटीलेटर जरूरी आहे.

व्हेंटीलेटरसह उपचाराची किंमत किती?

अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल व्हेंटीलेटरह उपचारासाठी प्रतिदिन 25,000 रुपये ते 50, 000 रुपयांपर्यंत घेतात. तर, रूमचे भाडे हॉस्पिटलवर अवलंबून असते. परंतु, सर्वात स्वस्त रूमचे भाडे प्रतिदिन 1,000 ते 1500 रुपयांच्या दरम्यान असते. जर तुम्हाला आयसीयु जरूरी असेल तर त्याची किंमत प्रतिदिन 7,000 रुपये ते 16,000 रुपयांपर्यंत असते.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार एका कोरोना व्हायरसच्या रूग्णावरील उपचाराचा खर्च 3 लाख रुपये प्रति आठवड्यापासून 16 लाख रुपये प्रति महीन्याच्या दरम्यान असू शकतो. कारण कोविड-19 चा विशेष उपचार नाही, यासाठी रूग्णाचा खर्च वाढत जातो.

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी औषध उपलब्ध नाही, यासाठी डॉक्टर रूग्णाची स्थिती पाहून वेगवेगळा उपचार करतात, जो एक प्रकारचा प्रयोग असतो. यासाठी खर्च जास्त होतो. उदाहरणार्थ सध्या उपचारासाठी Tocilizumab नावाचे औषध वापरे जात आहे, ज्याच्या एका डोसची किंमत 40,000 रुपयांपासून 60,000 रुपयांपर्यंत आहे.

पीपीईची किंमत

उपचारात पीपीईचा खर्च सुद्धा जोडला जातो, जो रूग्णाला द्यावा लागतो. याची किंमत हॉस्पिटलवर अवलंबून आहे, परंतु एक रूग्ण प्रतिदिन 3,000 रुपयांपासून 15,000 रुपयांपर्यंत किंमत चुकवतो.