इन्स्टंट शुगर कमी करण्यासाठी रोज ‘या’ वेळी करा ब्रेकफास्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, नियमित वेळेवर नाश्ता केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, तसेच कमी सुद्धा होते. डायबिटीज रूग्णांनी रोज कोणत्या वेळी ब्रेकफास्ट करावा आणि कोणते पदार्थ सेवन करावेत ते जाणून घेवूयात…

एन्डो 2021 मध्ये प्रसिद्ध एका संशोधनात खुलासा करण्यात आला आहे की, मधुमेहाच्या रूग्णांनी रोज सकाळी 8:30 वाजतापूर्वी नाश्ता करावा. यामुळे इन्सुलिन अडथळा आणि ब्लड शुगर स्तर कमी होतो.

नाश्त्यात काय खावे

तज्ज्ञांनुसार डायबिटीजच्या रूग्णांनी दिवसाची सुरुवात प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर आणि कडधान्यांनी करावी. यासाठी दही, अंडे, भाजी, टोस्ट आणि फळांचे सेवन करावे. ठराविक वेळी संतुलित आहार घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी दुधाचे सेवन करावे. यामुळे ब्लड शुगर दिवसभर नियंत्रणात राहते.