Treadmill Running Tips : ट्रेडमिलवर धावत असताना करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (angioplasty) सर्जरी करण्यात आली. सध्या सौरव गांगुलींची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुली यांना शनिवारी सकाळी व्यायाम करताना छातीत दुखणे जाणवले. ज्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा दादा ट्रेडमिलवर रनिंग करत होते. तज्ञ म्हणतात की ट्रेडमिलवर रनिंग करत असताना हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका असतो. आपण देखील ट्रेडमिलवर रनिंग करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा…

– हा व्यायामामुळे हृदयाची गती वेगवान होते आणि हृदय वेगाने पंप करण्यास सुरुवात करते. या वेळी जर हृदयाची गती सरासरी गतीपेक्षा जास्त होत असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

– तज्ञांचे मत आहे की ट्रेडमिलवर धावणे सोपे नसते. सपाट जमिनीवर धावण्यापेक्षा हे पूर्णपणे भिन्न असते. यासाठी जिम ट्रेनरचा सल्ला घ्यावा. सामान्यत: फ्रेशरने ट्रेडमिलवर कमी वेगाने धावावे. हळू हळू धावण्याचा वेग वाढवावा.

– जर ट्रेडमिलवर वेगाने धावले तर हार्ट अ‍ॅटॅकचा धोकाही वाढतो. तसेच स्टिरॉईडयुक्त प्रोटीन पासूनही दूर रहावे. याचे सेवन केल्यास हृदयविकाराच्या झटक्यासह इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो.

– कोणताही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म-अप करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात उर्जा प्रवाहित होते. तसेच शरीराची सर्व हाडे आणि स्नायू सक्रिय होतात. यासाठी आपण ट्रेडमिल वापरू शकता आणि ट्रेडमिलवर चालू शकता किंवा वॉर्म-अप रनिंग करू शकता.

– ट्रेडमिल वापरण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. यासाठी तुम्ही प्रशिक्षकाची मदत घेऊ शकता. एकदा पूर्ण समजल्यानंतर ट्रेडमिल वापरा.