Health Tip : 30 वर्षांचे झाल्यानंतर आवश्य करा ‘या’ 6 मेडिकल टेस्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उपचारापेक्षा चांगला आहे बचाव, ही गोष्टी आपण अनेकदा ऐकली असेल, परंतु कधी यावर विचार केला आहे का? नाही ना. जेव्हा आपल्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा अतिशय छोटा थांबा सुद्धा खुप उपयोगी ठरतो. नियमितपणे चेकअप केल्याने आजाराची वेळीच महिती समजू शकते आणि वेळेत उपचार होऊ शकतो. यासाठी आपल्याला वर्षात एकवेळ चेकअप आवश्य केले पाहिजे. विशेष करून जेव्हा आपले वय 30 च्या वर जाते.

असे यासाठी कारण जसजसे आपले वय वाढते, तसे आपल्या शरीराचे अनेक भाग मंदावतात आणि सोबतच अनेक आजारांची सुद्धा चाहूल लागू शकते. यासाठी तुमची लाइफस्टाइल कितीही व्यस्त असली, सर्वांनी नियमित चेकअप करणे आणि स्क्रीनिंग करणे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही विचार करत असाल तर केवळ डायबिटीज़, बीपी आणि कॉलेस्ट्रॉलच्या टेस्ट पुरेशा नाहीत. जर तुम्ही 30 वर्षांचे झाला असाल तर तुमच्यासाठी या 6 टेस्ट करणे खुप आवश्यक आहे.

ईसीजी टेस्ट
ईसीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डीयोग्राम टेस्ट केल्याने हृदयाच्या आजारांची माहिती मिळते. यामुळे हृदयरोगाची जोखीम समजण्यास मदत होते.

लिपिड प्रोफाइल टेस्ट
लिपिड प्रोफाइल टेस्ट कोलेस्ट्रोलच्या छोट्यातील छोट्या डिटेल्सची माहिती देते. 30 वर्षाच्या वयानंतर प्रत्येक दोन वर्षात ही टेस्ट करणे आवश्यक आहे. कुटुंबात हृदयरोग, लठ्ठपणा किंवा डायबिटीज सारखे आजार सामान्य असल्यास ही टेस्ट करायलाच हवी.

पॅप स्मियर टेस्ट
महिलांसाठी 30 वर्षांच्या वयानंतर नियमित पॅप स्मीयर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो आणि सोबतच एचपीव्ही टेस्ट सुद्धा नियमित केली पाहिजे. ही टेस्ट सरव्हेक्स म्हणजे गर्भाशय ग्रीवामध्ये थोडा जरी बदल झाला तरी सावध करून, सर्व्हाइल कॅन्सर आणि अनेक जीवघेण्या इन्फेक्शन्सच्या लक्षणांना पकडू शकते.

लिव्हरची टेस्ट
लिव्हर केमिस्ट्री टेस्ट, जी शारीरिक एंजाइम, प्रोटीन, ट्रायग्लिसराईडच्या चार्टिंग मोजून हे सांगते की, तुमचे लिव्हर किती निरोगी आहे. सोबतच हेपेटायटिस सारख्या अनेक प्रकारच्या इन्फेक्शन्सची सुद्धा माहिती मिळते. 30 व्या वर्षानंतर ही टेस्ट एकदा आवश्य करावी.

कोलोनस्कोपी टेस्ट
तर, पुरुषांसाठी 45-50 वर्षांच्या वयानंतर कोलोनस्कोपी टेस्ट खुप महत्वाची असते. विशेष करून डॉक्टरांचे म्हणणे आहे की, 30 व्या वर्षानंतरच पुरुषांनी ही टेस्ट सुरू केली पाहिजे. विशेषकरून तुमच्या कुटुंबात कोलोन कॅन्सरचा इतिहास असल्यास ती अवश्य केली पाहिजे.

जेनेटिक टेस्ट
कोणत्याही आजाराच्या सुरुवातीचे संकेत आणि लक्षणांसाठी जेनेटिक टेस्ट अतिशय आवश्यक आहे. या टेस्टमुळे म्यूटेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल आणि भविष्यात होणार्‍या आजारांबाबत सुद्धा माहिती मिळू शकते. ही काही प्रकरणात जोखिमीशी चांगल्या प्रकारे लढण्यासाठी माहिती सुद्धा देते. जर तुम्ही एका मुलाचे नियोजन करत असाल, तर जेनेटिक टेस्ट तुमच्या मुलाच्या आरोग्यासह त्याच्या सुरक्षेसाठी एक चांगला उपाय होऊ शकतो.