Health Benefits Of Tulsi : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह ब्लडप्रेशर देखील नियंत्रणात ठेवते तुळस, जाणून घ्या ‘हे’ 7 फायदे

नवी दिल्ली : तुळस एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यास आयुर्वेदात जीवनदायी मानले जाते. कोरोनाकाळात इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी तुळस सर्वांत चांगली आहे. सौंदर्य वाढीसह अनेक आजार तिच्या वापराने दूर ठेवता येतात. तुळस कोणत्या आजारांवर गुणकारी आहे ते जाणून घेऊयात.

1 इम्युनिटी वाढते
यातील अँटिऑक्सिडेंटमुळे तुळशीचा अर्क प्यायल्याने इम्युनिटी वाढते.

2 तणाव
तुळशीत फायटोकेमिकल्स असतात. ज्यामुळे कोर्टिसोलचा स्तर कमी होऊन तणाव वाढवणारे हार्मोन्स तयार होत नाहीत.

3 मधुमेह
तुळशीचा अर्क सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. ग्लुकोजचा स्तर नियंत्रणात राहतो. इन्सुलिनचा स्त्राव वाढतो.

4 ब्लड प्रेशर नियंत्रण
तुळशीचा अर्क सेवन केल्याने ब्लड प्रेशन नियंत्रणात राहते.

5 वजन कमी करणे
यासाठी तुळस सेवन करावी. तुळशीचा अर्क कोलेस्ट्रॉल कमी करतो.

6 गॅसची समस्या
तुळशीच्या सेवनाने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात.

7 सूज
गाठीमुळे सूज आली असेल तर तुळशीचे सेवन करावे. यातील बीटा कॅरिओफिलीनमुळे सूज दूर होते.