उन्हाळ्यात इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज करा तूपाचे सेवन, ‘हे’ 3 जबरदस्त फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तूप हा भारतीय पदार्थांचा महत्वाचा भाग आहे. तूप अनेक आजारांमध्ये उपयोगी ठरते. आयुर्वेदात याचे अनेक उपाय सांगितले आहेत. विशेष करून बदलत्या हवामानात होणारा सर्दी-खोकला आणि फ्लूसाठी हे रामबाण औषध आहे. सोबतच यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. जर तुम्हाला तूपाचे फायदे माहित नसतील तर जाणून घेवूयात…

1  पेशींच्या वाढीत सहायक

तूपात हेल्दी फॅट असते. यामुळे शरीरात पेशींचा विकास होतो. सोबतच हे शरीरातील पोषकतत्वांचे अवशोषण करून महत्वाची हार्मोन उत्सर्जित करते. यासाठी विविध पदार्थांमधून त्याचे सेवन करा.

2  बद्धकोष्ठता दूर होते

एका संशोधनानुसार, तूपात ब्यूटीरिक अ‍ॅसिड भरपूर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. मेटाबॉलिज्म व्यवस्थित होते. ब्लोटिंग, पोटदुखीत आराम मिळतो.

3  इम्यून सिस्टम मजबूत होते

डॉक्टर कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत करण्याचा सल्ला देतात. याशिवाय, बदलत्या हवामानात आजारी पडण्याचा धोका वाढतो. अशा हवामानात तुम्ही डाएटमध्ये तूपाचा समावेश करू शकता. तूपाच्या सेवनाने संसर्गाचा धोका सुद्धा कमी होतो. यातील ब्यूटीरिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टम मजबूत करते.