कोरोनातून लवकर रिकव्हर होण्यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाचा कहर देशात भयंकर होत चालला आहे. याच्यापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि शारीरीक अंतर हे सुरक्षा कवच आहे. याशिवाय, संक्रमित होणे किंवा संसर्गाची लक्षणे दिसल्यास होम आयसोलेशन आवश्यक आहे. तज्ज्ञ कोरोनातून लवकर रिकव्हर होण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देतात, याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

1  नाचणी आणि ओटमीलचे सेवन करा

तज्ज्ञ नाश्त्यात नाचणी किंवा ओटमील खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये फायबर भरपूर असते. व्हिटॅमिन-बी, कार्ब असते. याचे लवकर पचन होते. अंड्याचेही सवेन करा.

2  खिचडी खा

डॉक्टर नेहमी आजारी लोकांना खिचडी खाण्याचा सल्ला देतात. आरोग्यासाठी ती खुप लाभदायक आहे. यास सुपरफूड सुद्धा म्हणतात. खिचडी डाळ आणि भाज्या टाकून बनवली जाते.

3  भरपूर पाणी प्या

आजारातून लवकर बरे होण्यासाठी पाणी महत्वाचे भूमिका पार पाडते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. टॉक्सिन बाहेर पडतात. ओआरएसचे सुद्धा सेवन करा. ग्रीन टी आणि काढा प्या.

4  जंक फुड्स टाळा

कोरोना काळात पॅकेटबंद वस्तूंचे सेवन टाळा. विशेषकरून होम आयसोलेशनमध्ये जंक फुड्स टाळा. याऐवजी व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्यांचे जास्त सेवन करा.

5  सुकामेवा आणि बी खा

सुकामेवा आणि बी मध्ये अँटी ऑक्सीडेंट्स गुण आढळतात. सोबतच आवश्यक पोषक तत्व आढळातात. संक्रमितांनी रोज सुकामेवा आणि सीड्सचे सेवन करावे.