Iodine For Covid 19 : कोविड-19 व्हायरसला पूर्णपणे ‘निष्क्रिय’ करू शकते आयोडिन – रिसर्च

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी काही देशांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले आहे, परंतु भारतात अजूनही हा आजार नियंत्रणाच्या बाहेर आहे. येथील लोक सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अजूनही गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. याच कारणामुळे आपल्या देशात आतापर्यंत एकुण कोरोना संक्रमितांची संख्या 55 लाख 62 हजार झाली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध उपाय शोधले जात आहेत. नवनवीन संशोधन केले जात आहे. आता एका अभ्यसात ही बाब समोर आली आहे की, आयोडीनच्या मदतीने कोरोनाला पसरण्यापासून रोखता येऊ शकते.

युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात एक सल्ला दिला आहे की, आयोडीनच्या मिश्रणाने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते. ओटोलरिन्जियोलॉजी-हेड अँड नेक सर्जरीत प्रकाशित अभ्यासानुसार हे सांगण्यात आले आहे.

अभ्यासाठी संशोधनकांनी तीन वेगवेगळे आयोडीन मिश्रण 0.5 टक्के, 1.25 टक्के आणि 2.5 टक्केमध्ये व्हायरसची प्रतिक्रिया पाहिली.

आयरलँडच्या डबलिन शहराच्या सेंट जेम्स हॉस्पीटलमध्ये 128 कोविड पॉझिटिव्ह रूग्णांवर आयरिश अभ्यास करण्यात आला.

अभ्यासानुसार, सर्वात कमजोर कंन्सट्रेशन 0.5 सह सर्व तीन मिश्रण, पूर्णपणे व्हायरसला निष्क्रिय करू शकते. संशोधकांनुसार, 15 सेकंदच्या आत 0.5 मिश्रणात व्हायरस निष्क्रिया झाला. तर इथेनॉल अल्कोहलसोबत एकच परीक्षण करण्यात आले होते, परंतु याचा खास परीणाम दिसून आला नाही.

एका रिपोर्टमध्ये या गोष्टीचा खुलासा सुद्धा झाला आहे की, आयोडीन सार्स आणि मर्ससह संसर्गाच्या उपचारात वापरले जाऊ शकते. हे नोज डिसइन्फेक्टेंट म्हणून वापरता येऊ शकते आणि रूग्णाच्या नाकाद्वारे टाकले जाते.

ही प्रक्रिया ड्रॉपलेट्स आणि एरोसोलच्या माध्यमातून व्हायरस पसरवण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. इतकेच नव्हे, तर हे वेटिंग रूम आणि हॉस्पीटल, क्लिनिकमध्ये व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत करेल.

संशोधकांनी हे देखील म्हटले की, ही क्रिया कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे विकसीत करण्याचा धोका कमी करू शकते.

ही क्रिया वायरल लोक कमी करण्यासह व्हायरसमुळे फुफ्फुसांचे सुद्धा रक्षण करते.