Health News | सावधान ! ‘हे’ 4 पदार्थ खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास होऊ शकते आरोग्याचे मोठे नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : Health News | खाल्ल्यानंतर काही लोक ताबडतोब पाणी पितात. आयुर्वेदात यास चुकीचे म्हटले आहे. आयुर्वेद सांगतो की, अनेक पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळले पाहिजे. हे पदार्थ (Health News) कोणते ते जाणून घेवूयात.

 

चने (Gram) –

भाजलेले चने खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. कारण चने पचवण्यासाठी आपल्या शरीराला तीक्ष्ण पाचकाग्नी किंवा जठराग्नीची आवश्यकता असते. पण पाणी प्यायल्याने हा आग्नी शांत होतो. यामुळे चने पचन होत नाहीत. पचन डिस्टर्ब होते आणि पोटात दुखते.

 

फळे (Fruits) –

खरबूज आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे पोटात गडबड होऊ शकते. सोबतच अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास जीआय हालचाल वाढेल. यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होईल. ज्यामुळे डायरिया, अतिसारची समस्या होऊ शकतो.

 

आईस्क्रीम (Ice cream) –

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे घसा खराब होऊ शकतो. 10 मिनिटानंतर पाणी प्या.

 

शेंगदाणे (Peanuts) –

शंगदाण्याचा प्रभाव गरम आहे. तसेच याचा गुण कोरडा असतो. ज्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा जास्त होते. असे केल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते. काही वेळानंतर पाणी प्या.

 

Web Title : Health News | water should not be taken immediately after eating these foods

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर 2 दिवसात शासनाकडून निर्णय

Nagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या वकिल महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार; सासु-सासर्‍यांसह चार जणांना अटक

Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा