Health Survey | भारतीयांची शारीरीक उंची वाढणे झाले बंद? संशोधनात केला हैराण करणारा दावा; जाणून घ्या किती झाली घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Health Survey | भारतीयांची शरीराची उंची (Hight) वाढत नसल्याचा आश्चर्यकारक दावा एका संशोधनात केला आहे. हा दावा ‘1998 ते 2015 पर्यंत भारतात प्रौढाच्या उंचीचा कल आणि राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पुरावे’ (1998 to 2015 and National Family and Health Survey Evidence) नावाच्या एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे.

भारतात 2005-06 ते 2015-16 पर्यंत प्रौढ पुरुष आणि महिलांच्या सरासरी ऊंचीत 1998-99 च्या वाढीनंतर घसरण दिसून आली आहे (height of Indians is not increasing). गरीब गटातील महिला आणि आदिवासी महिलांमध्ये (Tribal Women) सर्वात जास्त घसरण दिसून आली.

भारतात हा ट्रेंड ग्लोबल ट्रेंड (global trend) च्या उलट दिसत आहे. कारण यापूर्वी अनेक संशोधनातून समजले आहे की, जगभरात प्रौढांची सरासरी उंची वाढत (Health Survey) आहे. या संशोधनाच्या लेखकांनी कथित प्रकारे म्हटले की, जगभरात सरासरी उंचीमध्ये वाढीच्या बाबतीत, भारतात प्रौढांच्या सरासरी उंचीतील घसरण चिंताजनक आहे.

तज्ज्ञांनी तपासाची केली मागणी

भारतात उंची कमी होण्याची प्रवृत्ती जागतिक प्रवृत्तीच्या उलट दिसत आहे. अनेक अभ्यासात ही बाब समोर आली आहे की, जगभरातील दुसर्‍या देशांमध्ये प्रौढांची उंची वाढत चालली आहे, परंतु भारतात असे नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतासाठी ही चिंताजनक बाब आहे. यासोबतच अनेक तज्ज्ञांनी या कारणांचा शोध घेण्यासाठी तपासाची मागणी केली आहे.

बिगर-अनुवंशिक कारणांचा सुद्धा समावेश

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विविध अनुवंशिक गटांच्या रूपात भारतातील लोकसंख्येसाठी उंचीची विविध मानके समजून घेणे
आणि कारणाचा शोध घेण्यासाठी तपासाची विशेष प्रकारे आवश्यकता आहे. संशोधनात हा सुद्धा दावा केला आहे की,
उंची वाढण्यापाठीमागे केवळ अनुवंशिक कारणेच (Health Survey) नाहीत.

यामध्ये अनेक प्रकारची बिगर अनुवंशिक कारणे सुद्धा आहेत.
संशोधनात समजले की, महिलांमध्ये सरासरी उंची जवळपास 0.42 सेमी कमी झाली आहे.
तर पुरुषांच्या सरासरी उंचीत 1.10 सेमीची घसरण नोंदली गेली आहे.

Web Title :- Health Survey | did indians stop growing in body length claimed in the study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 15 वर्षीय मुलीच्या आईशी ‘झेंगाट’ असणार्‍यांनं केलं घृणास्पद कृत्य, ‘तिच्या’शी अश्लिल चाळे करणार्‍यावर FIR, हडपसरमधील धक्कादायक प्रकार

Shiv Sena MLA Shahajibapu Patil | ‘मताला प्रत्येकी 3 हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक;
शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Town Planning | राज्यातील अनधिकृत बांधकामांना कम्पाऊंडिंग चार्जेस आकारून ‘अभय’; नगरविकास विभागाने काढला आदेश