कोरोना काळात ‘थकवा’ आणि ‘श्वास’ घेण्याची समस्या टाळण्यासाठी ‘या’ पध्दतीनं घ्या Heart आणि फुफ्फुसांची काळजी

नवी दिल्ली : असे पेशंट ज्यांना हार्ट आणि लंग्जचा आजार अगोदरपासून आहे त्यांनी कोरोना काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कशा प्रकारची काळजी आणि सावधगिरी त्यांनी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्यापासून वाचवू शकते ते जाणून घेतले पाहिजे.

हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज आणि ब्रिथिंगचा धोका
डॉक्टरांनुसार, असे पेशंट ज्यांची ऑक्सीजन लेव्हल 90 पर्यंत पोहचते, त्यांनी सावध व्हावे. 85 पर्यंत पोहचले तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे. ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याने थकवा, श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो. यासोबतच जर तुम्हाला लंग्ज आणि हृदय निरोगी ठेवायचे असेल तर सर्वप्रथम वजनाकडे लक्ष ठेवा. यासाठी डाएटवर लक्ष द्यावे लागेल, ज्यामुळे अंतर्गत अवयव चांगल्याप्रकारे काम करतील.

होम आयसोलेशनमध्ये राहू नये
डॉक्टरांनुसार, लक्षणे नसलेल्या पेशंटला होम आयसोलेशनचा सल्ला दिला जात आहे. परंतु, हार्ट, श्वास, लिव्हर, किंवा लंग्जशी संबंधीत आजार असलेल्या रूग्णांसाठी एक्सपर्टचा सल्ला वेगळा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा रूग्णांनी होम आयसोलेशन कधीही घेऊ नये. संक्रमित झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, ज्यामुळे धोका वाढल्यास वेळीच उपचार करता येतात. यासोबतच हृदयाच्या रूग्णांनी कोरोनापासून वाचण्यासाठी आपली जास्त काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे.

तणावापासून रहा दूर
बहुतांश लोकांना हार्ट अटॅक येतो जे तणाव घेतात. डॉक्टरांनुसार, जेवढा तणाव जास्त घ्याल शरीराला तेवढेच स्ट्रेस हार्मोन्सशी लढावे लागेल. यामुळे तुमचे हृदय कमजोर होईल आणि हृदयरोगी बनाल.