‘डिहायड्रेशन’ ठरू शकतं जीवघेणं, ‘ही’ 4 लक्षणं जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – सध्याच्या हवामानात डिहायड्रेशनची समस्या होण्याची मोठी शक्यता आहे. हे फार गंभीर नसलं तरी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवते. घामाद्वारे, मुत्राद्वारे, मलाद्वारे शरीरातून पाणी बाहेर जात असते. शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी कमी पाणी प्यायल्याने डिडायड्रेशनचा धोका वाढतो. डिहायड्रशेन झाल्यावर योग्यवेळी औषधे न घेतल्याने हीट स्ट्रोकचा धोका असतो. गंभीर स्थितीत मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशनचे दुष्परिणाम तसंच शरीराला डिहायड्रेट होण्यापासून कसं वाचवता येईल याबाबत सांगणार आहोत.

ही आहेत लक्षणं
1 डोळ्यांसमोर अंधार येणं
2 सतत चक्कर येणं
3 त्वचा कोरडी पडते.
4 ओठ फाटायला सुरूवात होते.

अशी घ्या काळजी
1 डिहायड्रेशन असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी, नारळपाणी, ताक या पदार्थांचे सेवन करावे.
2 डिहाड्रेशनची समस्या उद्भवल्यास सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. शरीराला आराम द्या.
3 महिलांनी कमीत कमी 2.5 लीटर आणि पुरूषांनी 3 लीटर पाणी कमीतकमी प्यावं.
4 तीन ते चार बाटल्या पाणी प्यायल्याने आरोग्य चांगलं राहू शकतं.
5 द्रवपदार्थांचे सेवन करायला हवं.