Health Tips | थकवा आणि आळस दूर करण्यासाठी डाएटमध्ये समावेश करा हे 8 हेल्दी फूड्स, दिवसभर रहाल उत्साही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | आजकाल लोकांना खराब जीवनशैली (Lifestyle) आणि अस्वस्थ आहारामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दिवसभर बिझी शेड्यूल आणि रात्री योग्य झोप न घेतल्याने लोकांना थकवा जाणवतो. त्यामुळे कामाची उत्पादकताही कमी होते. अशावेळी चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात विविध पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे थकवा दूर होईल. हे पदार्थ दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतील. आहारात तुम्ही कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता ते जाणून घेवूयात. (Health Tips)

 

1. ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टी तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करतो. हा तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करतो. त्यामुळे तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचा थकवा दूर होतो. तुम्ही रोज एक कप ग्रीन टी पिऊ शकता.

 

2. बडीशेप (Fennel)
बडीशेप केवळ एक उत्तम माउथ फ्रेशनर (Mouth freshener) म्हणून काम करत नाही तर ते तुमच्या शरीरातील सुस्ती दूर करण्यातही मदत करते. त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमसारखे (Calcium, Iron, Potassium) पोषक घटक असतात.

 

3. दही (Curd)
रोज एक वाटी दही खाऊ शकता. त्यात प्रोटीन असते. हे निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे थकवा आणि आळस दूर होतो.

4. पाणी (Water)
पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगी राहता. हे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते.
ते तुमच्या शरीराला ऊर्जा पुरवते. त्यामुळे थकवा आणि आळस दूर होतो. (Health Tips)

 

5. ओट्स (Oats)
ओट्समध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.
त्यामुळे थकवा आणि आळस दूर होतो. तुम्ही ओट्सचे नियमित सेवन करू शकता.

 

6. केळी (Banana)
केळी हे अतिशय आरोग्यदायी आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यात भरपूर पोषकतत्व असतात.
त्यात कार्ब्ज असतात. हे थकवा आणि आळस दूर करण्याचे काम करते.

 

7. संत्रे (Oranges)
संत्रे हे रसाळ फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते.
हे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. शरीराला उत्साही ठेवण्यास मदत होते.

 

8. पालक (Spinach)
पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. हे मेटाबॉलिज्म गतिमान करण्यास मदत करते.
हे फॅट जलद बर्न करण्यास मदत करते. हे थकवा आणि आळस दूर करण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | health tips add these foods in your diet for energy and cure weakness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन

 

Diabetes Symptoms | शरीराचा हा भाग पिवळा होऊ लागला असेल तर व्हा अलर्ट, डायबिटीजचा इशारा तर नाही ना?

 

How to Prevent Cold and Fever | पावसाळ्यात वेगाने पसरत आहे सर्दी-तापाची साथ, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावाची पद्धत