TV, मोबाईल सुरु ठेवून झोपल्यास होतात ‘हे’ 5 आजार, वेळी सावध व्हा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – टीव्ही सुरू ठेवून झोपण्याची अनेकांना सवय असते. विशेषता महिलांमध्ये ही सवय जास्त प्रमाणात दिसून येते. नॅशनल इन्स्टीट्यट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार रात्री टीव्ही सुरू ठेवून झोपल्याने महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु या सवयीमुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. हे संशोधन जामा इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. टीव्ही किंवा मोबाईल सुरू ठेवून झोपल्याने कोणते दुष्परिणाम होताते ते आपण जाणून घेणार आहेत.

का आहे घातक
टीव्ही पाहताना त्यातून बाहेर येणारा कृत्रिम प्रकाश आरोग्यासाठी घातक ठरतो. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार झोप, आरोग्य, वजन यांवर कृत्रिम प्रकाशाचा परिणाम होत असतो. म्हणूनच मोबाईल किंवा टीव्ही, लॅपटॉप सुरू ठेवून झोपणं घातक ठरू शकतं.

होऊ शकतात या समस्या

1 कमरेचे त्रास उद्भवू शकतात.
2 महिलांना ब्रेस्ट कॅन्सरसारख्या इतर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
3 वजन वाढण्याचा धोका सर्वाधिक जाणवतो.
4 स्लीप हार्मोन मॅलिटोनिन प्रभावित होतो.
5 डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात.