Coronavirus : नक्की काय आहे ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ ? किती सुरक्षित आहे याचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे. या जीवघेण्या आजाराचा परिणाम आता अमेरिकेत वाढत चालला आहे. अमेरिकेत जवळपास 4 लाख लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत, तर आतापर्यंत 13 हजार लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. अमेरिकेत उच्च वैद्यकीय रिसर्च टीम यावर उपचार करण्यासाठी आणि वॅक्सीन काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक औषधं कोरोनावर उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. मार्चमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत कोविड – 19 वर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अत्यंत प्रभावी असल्यावर जोर दिला. ते म्हणाले, मला विश्वास आहे की हे औषध काम करेल आणि आपल्याला हे वापरुन पाहिले पाहिजे.

काय आहे हॉयड्रॉक्सीक्लोरोक्वीन
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर शक्यतो मलेरियाच्या उपचारासाठी केला जातो. तसेच याचा वापर आर्थराइटिसच्या उपचारात देखील केला जातो. दुसऱ्या विश्वयुद्धात या औषधाची निर्मिती करण्यात आली होती. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी ल्यूपस सेंटरच्या मते, मलेरियाच्या उपचारादरम्यान मासपेशी, सांधेदुखी, त्वचेवरील रॅशेश, इंफ्लेमेशन ऑफ हर्ट, लंग लाइनिंग, थकवा आणि ताप सारखी लक्षण दिसतात. त्यावर हा औषधाद्वारे उपचार करता येतो. आता मानले जात आहे की हे औषध कोरोना व्हायरसच्या उपचारावर प्रभावकारी ठरु शकते. असे असले तरी यावर कोणतीही क्लिनिकल ट्रायल झालेली नाही.

एका छोट्या फ्रेंच संशोधनात हे सांगण्यात आले होती की हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोविड – 18 वर उपचारासाठी उपयोगी ठरु शकते. ज्यानंतर ट्रम्प यांनी या औषधाला कोरोनाच्या उपचारासाठी गेम चेंजर असल्याचे सांगितले.

या औषधाचा उपयोग सुरक्षित आहे ?
काही दिवसांपूर्वी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने कोरोना व्हायरसमुळे होणारा आजार कोविड – 19 वर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपयोगी असल्याचा सल्ला दिला होता. असे असले तरी या औषधाचे साइफ इफेक्ट देखील आहे. ते म्हणजे, हार्ट ब्लॉक, हार्ट रिदम डिस्टर्बेंस, चक्कर येणे, जीव घाबरा होणं, उल्टी होणं असे आहेत. याशिवाय या औषधाचा ओवरडोस घेतल्यास जीवाला धोका उद्भवू शकतो, रुग्ण बेशुद्ध पडू शकतो.