Healthy Breakfast | सकाळी हेल्दी नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात ! खा ‘या’ 4 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन, दिवसभर राहिल एनर्जी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सकाळचा योग्य नाश्ता (Healthy Breakfast) आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण यातूनच तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहते. शिवाय वजन वाढण्यास प्रतिबंध करता येतो. निरोगी दिवसाची सुरुवात निरोगी नाश्त्याने होते. सकाळचा नाश्ता आरोग्यदायी (Healthy Breakfast) असेल तर शरीर निरोगी राहते. पोटाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते. नाश्ता शरीराला दिवसभर चार्ज ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते (Healthy And Protein Rich Breakfast).

 

 

1. ओट्स इडली (Oats Idley) -उन्हाळ्यात नाश्त्या
त ओट्सचा समावेश करा. यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघेल. अन्नही सहज पचन होईल. दही, चना डाळ, उडीद डाळ, गाजर आणि ओट्स मिक्स करून हे बनवू शकता. या इडलीत प्रोटीन भरपूर आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करून शरीर निरोगी आणि मजबूत बनवा. (5 Healthy Breakfast Foods For Weight Loss)

 

 

2. सफरचंदाची खीर (Apple Pudding) –
सफरचंदाची खीर अनेकांना माहित नसते. पण सफरचंद खीर ही एक आरोग्यदायी आणि पौष्टिक रेसिपी आहे. जी सकाळच्या नाश्त्यात बनवता येते. सफरचंदाची खीर बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. ती अनेक प्रकारच्या आरोग्यदायी गोष्टींचे मिश्रण करून बनवता येते आणि दिवसभर उर्जा देते. (Healthy Breakfast)

 

3. सोया उत्तपा (Soya Uttapa) –
सोया उत्तपाचा हेल्दी डाएटमध्ये समावेश होतो. जर तुम्ही नाश्त्यात सोया उत्तपा खाल्ला तर दिवसभर उत्साही वाटेल. हा एक आरोग्यदायी आणि प्रोटीन युक्त नाश्ता आहे. सोया, रवा आणि काही चिरलेल्या भाज्या घालून तो तयार करू शकता. तो रुचकर आणि आरोग्यदायी आहे.

 

 

4. एग ऑम्लेट (Egg Omelet)
सकाळच्या नाश्त्यासाठी अंडी सर्वोत्तम मानली जातात. अंडी हा प्रोटीनचा स्वस्त आणि चांगला स्रोत आहे. ते अनेक प्रकारे बनवता आणि खाता येते. अंडा करी, ऑम्लेट किंवा अंडा भुर्जी बनवू शकता. अनेकांना उकडलेले अंडे खायला आवडते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Breakfast | 4 healthy breakfast foods for weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

 

Dilip Walse Patil | फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्लांविरुद्ध कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 

Mahashivratri 2022 | भगवान शंकराला पसंत आहे बेलपत्र, ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने दूर होतील Diabetes सारखे 5 गंभीर आजार

 

Multibagger Stock | 3 रुपये 71 पैशांच्या ‘या’ शेयरने 1 लाखाचे केले रू. 6.53 कोटी, आता जाईल रू. 2600 पर्यंत, एक्सपर्ट आहेत बुलिश