Mahashivratri 2022 | भगवान शंकराला पसंत आहे बेलपत्र, ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने दूर होतील Diabetes सारखे 5 गंभीर आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mahashivratri 2022 | महाशिवरात्री (Mahashivratri) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी (Hindu Festivals) एक आहे. भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री सण 1 मार्च रोजी (Maha Shivratri on March 1) साजरा होणार आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी (Mahashivratri 2022) झाला होता.

 

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला (Lord Shankara) प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात. माता पार्वतीप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास करतात आणि विधीवत पूजा करतात. या दिवशी शिवभक्त देवाला बेलाची पाने (Belpatra) अर्पण करतात.

 

असे मानले जाते की, बेलपत्र हे भगवान शंकराचे सर्वात प्रिय पान आहे. बेलाच्या पानांनी भगवंताची पूजा केल्याने त्यांच्या भक्तांना अपार आशीर्वाद मिळतात. बेलपत्र हे एक त्रिकोणी पान आहे, जे हिंदू धर्मातील तीन मुख्य देवतांचे प्रतीक मानले जाते, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू (Lord Vishnu) आणि भगवान शंकर. बेलपत्राला आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicinal Plants) मानली जाते आणि ते अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यास मदत करते.

 

 

बेल पानांचे फायदे (Benefits Of Bel Patra Leaves)

बेल (Bel Patra) ही एक औषधी वनस्पती असून त्याची फळे, मूळ, पाने आणि फांद्या यांचा उपयोग औषधे (Medicines) बनवण्यासाठी केला जातो.

बद्धकोष्ठता (Constipation), अतिसार (Diarrhea), मधुमेह (Diabetes) आणि इतर रोगांसाठी ते वापरले जाते.

बेलच्या पानांमध्ये टॅनिन (Tannin), फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आणि कॉमरिन (coumarin) नावाची रसायने असतात, जी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात. ही रसायने सूज कमी करण्यास मदत करतात.

दमा (Asthma), अतिसार आणि हाय ब्लड शुगरसारख्या (High Blood Sugar) विकारांचा धोका कमी करतात.

 

1) मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त (Useful For Controlling Diabetes)
बेलाची पाने शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control) ठेवण्यास मदत करतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर रेचक गुणधर्म (Laxative Properties) असतात, जे पुरेसे इंसुलिन (Insulin) तयार करण्यास आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात.

 

 

2) श्वसनाच्या समस्यांसाठी (Breathing problems)
फार कमी लोकांना माहित आहे की बेलाच्या पानांपासून एक प्रकारचे तेल काढले जाते. ज्यास असेंशियल ऑईल (Essential Oil) म्हणतात. हे तेल दमा आणि सर्दीसह (Cold) श्वसन समस्या बरे करण्यासाठी खुप उपयुक्त ठरू शकते.

 

 

3) बद्धकोष्ठतेवर उपचार (Treatment Of Constipation)
बेलाची पाने थोडे मीठ (Salt) आणि मिरपूडसोबत (Pepper) चावल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
हे आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी ओळखले जाते.

 

 

4) अतिसार आणि कॉलरा (Diarrhea And Cholera)
बेलाच्या पानांमध्ये टॅनिन (Tannin) असते, ज्यामुळे ते अतिसार आणि कॉलरा सारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.
त्याच्या वाळलेल्या कच्च्या पावडरचा उपयोग जुनाट अतिसारावरही केला जातो. तुम्ही कच्ची पाने देखील चावू शकता.

 

 

5) अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-inflammatory Properties)
बेलपानांमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटी-फंगल (Anti-fungal Properties) आणि अँटी-व्हायरल गुणधर्म (Anti-viral Properties) आहेत,
ज्यामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या संसर्गाच्या उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो.
बेलाच्या पानांमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म (Antimicrobial Properties) देखील आढळतात, ज्यामुळे अनेक संसर्ग बरे होण्यास मदत होते.

 

Web Title :- Mahashivratri 2022 | mahashivratri know 5 surprising health benefits of chew bel patra or bilva leaves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

 

Crime News | पती-पत्नीच्या भांडणाचा शेवट क्रूर; जिलेटीनच्या स्फोटाने उडाल्या शरीराच्या चिंधड्या

 

Janhavi Kapoor Latest Hot Look | जान्हवी कपूरनं रिवीलिंग ड्रेस घालून केला कहर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ