Healthy Chutney Recipe | स्नॅक्ससोबत आवश्य ट्राय करा टोमॅटो-खजूरची स्पेशल चटणी, लिहून घ्या ‘ही’ रेसिपी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Chutney Recipe | खजुराच्या (Date) सेवनाने रक्ताची कमतरता दूर होते, तसेच मेंदूही तीक्ष्ण होतो. खजूर खाल्ल्याने रक्ताभिसरणही ठीक होते. त्यात आयर्न, खनिजे, कॅल्शियम, अमिनो अ‍ॅसिड, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे (Iron, Minerals, Calcium, Amino Acid, Phosphorus And Vitamins) असतात. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये (Tomato) व्हिटॅमिन सी, पोटॅशियम (Vitamin C, Potassium) मुबलक प्रमाणात असते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे खजूर-टोमॅटोची चटणी (Date-Tomato Chutney) आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटो-खजुराची चटणी स्नॅक्ससोबत खाण्याचा आनंद वेगळाच असतो. ती कशी बनवायचे ते जाणून घेवूयात (Healthy Chutney Recipe)…

 

टोमॅटो-खजूर चटणी साहित्य : (Tomato-Date Chutney Ingredients)

1 कप खजूर (चिरलेला)

1 कप टोमॅटो (चिरलेला)

1/2 कप चिंचेची पेस्ट

1 टीस्पून लाल तिखट

2 टीस्पून बडीशेप

1/2 टीस्पून मोहरी चवीनुसार

अर्धा कप गूळ

1 टीस्पून तेल

आवश्यकतेनुसार पाणी (Healthy Chutney Recipe)

टोमॅटो-खजूर चटणी कशी बनवायची : (How To Make Tomato-Date Chutney)

मध्यम आचेवर पॅन गरम करा.

नंतर त्यात बडीशेप आणि मोहरी घालून मध्यम आचेवर तळून घ्या.

बडीशेप आणि मोहरीचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करा.

आता भाजलेली बडीशेप आणि मोहरी थंड करून बारीक वाटून घ्या.

यानंतर भांड्यात गूळ, खजूर, टोमॅटो, चिंचेची पेस्ट, लाल तिखट आणि वाटलेली बडीशेप-मोहरी घालून मिक्स करा.

नंतर कढईत तेल टाकून गॅसवर गरम करा.

सर्व साहित्य एकत्र करून त्यात पाणी घालून मध्यम आचेवर शिजवा.

5 मिनिटे शिजवा, जेव्हा गूळ वितळेल तेव्हा आच कमी करा आणि 20 ते 25 मिनिटे चटणी शिजवा.

खजूर आणि टोमॅटो चांगले शिजले आणि चटणी घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

खजूर-टोमॅटो चटणी तयार आहे.

आता चटणी थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Chutney Recipe | tomato date chutney recipe in marathi how to make khajoor special chutney know benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Foods To Avoid In Piles | मुळव्याधीने असाल त्रस्त तर खाण्या-पिण्याच्या ‘या’ गोष्टी टाळा; जाणून घ्या

 

Fatty Liver Cure | फॅटी लीव्हरने असाल त्रस्त तर ‘या’ 5 फूड्सपासून ताबडतोब व्हा दूर; जाणून घ्या

 

Diabetes Warning | पायावर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या