फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टीचा करा समावेश, आजारांपासून रहाल दूर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वात जास्त परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत आहे. यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊन जीव धोक्यात येत आहे. सध्या सर्वत्र ऑक्सीजनची मागणी याच कारणामुळे वाढली आहे. यासाठी कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी इम्युनिटी मजबूत करण्यासह फुफ्फुसांना स्ट्राँग करणे आवश्यक आहे.

फुफ्फुसांच्या मजबुतीसाठी हे उपाय करा

1 आल्याचा चहा

फुफ्फुसासाठी आल्याचा चहा लाभदायक आहे. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात.

2 लसून

लसणामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. लसणातील अनेक मिनरल्स, व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सीडेंट आणि अँटीफंगल एस्ट्रिजेंटच्या रूपात काम करतात. जे फुफ्फुसात श्वासाद्वारे पोहचलेले प्रदूषणाचे पार्टिकल्स, धूळीचे पार्टिकल्स आणि बॅक्टेरिया इत्यादीला जाम होऊ देत नाही. यामुळे फुफ्फुसे स्वच्छ राहतात. रोज 3-4 लसून पाकळ्या रिकाम्या पोटी सेवन करा.

3 डाळिंब

डाळिंब पचनशक्ती ठिक राहण्यासाठी तसेच फुफ्फुसे, हार्ट निरोगी ठेवते. यात फायबर, व्हिटॅमिन बी, सी, आणि के सह आयर्न, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड आढळते.

4 प्राणायाम

फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी सर्वात जास्त मदत प्राणायामची होते. यासाठी रोज अनुलोम विलोम, कपालभाती, उज्जायी, भ्रस्त्रिका, भ्रामरी इत्यादी करा.

5 गुळण्या करा

कोरोनापासून बचावासाठी तसेच फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी हळदीच्या गुळण्या करा. गरम पाण्यात हळद टाकून एक ते दोन वेळा आवश्य गुळण्या करा. यामुळे शरीर डिटॉक्स होते तसेच हार्ट, लिव्हर सह फुफ्फुस निरोगी राहतात. शिवाय गुळण्या केल्याने घशात खवखव, सर्दी, खोकला आणि कफची समस्या होणार नाही.