Diet tips : नाश्ता करतेवेळी करू नका ‘या’ 7 चूका; रक्ताची कमतरता, थकवा, कमजोरी सारख्या रोगांचा अड्डा होईल शरीर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हेल्दी अँड फिट राहण्यासाठी ब्रेकफास्ट खुप जरूरी आहे. सकाळी हेल्दी नाश्ता केल्याने शरीराला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळते. नेहमी असे दिसून येते की, लोक सकाळी पराठे, ब्रेड जॅम आणि तेलात बनवलेल्या अनेक पदार्थांचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे.

हे सुद्धा खरे आहे की काही लोक नाश्ता करत नाहीत. पण ही सवय हळुहळु शरीराला कमजोर बनवू शकते. एक हेल्दी नाश्ता तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचावतो, असे एक्सपर्ट सांगतात. आम्ही तुम्हाला ब्रेकफास्टशी संबंधीत अनेक अशा चूका सांगणार आहोत, ज्यांच्यापासून तुम्हाला दूर राहिले पाहिजे.

या आहेत त्या चूका –
1 हेल्दी नाश्ता न करणे
सकाळी नाश्ता न करणे हे शरीरासाठी नुकसानकारक आहे. नाश्ता केल्याने दिवसभर शरीराला उर्जा मिळते. पचनशक्ती चांगली होते. लो ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

2 योग्य प्रमाणात नाश्ता
काही लोक खुपच हलका नाश्ता करतात. हे योग्य नाही. योग्य प्रमाणात नाश्ता केला पाहिजे. मात्र, जास्त प्रमाणात सुद्धा खाऊ नका, नाश्त्यातून आवश्यक तत्व मिळाले पाहिजेत.

3 उशीरा नाश्ता करणे
सकाळी उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता केला पाहिजे, असे एक्सपर्ट सांगतात. खुपच उशीरा आणि जास्त नाश्ता केल्यास दिवसभरातील जेवण प्रभावित होते. रात्री जास्त जेवण केले तर सकाळी नाश्ता उशीरा कराल. उशीरा नाश्ता केल्यास दिवसभर जास्त खाऊ शकता.

4 कार्ब्स आणि प्रोटीनेयुक्त पदार्थ टाळा
नाश्ता म्हणजे पुरी, पराठा नव्हे. नश्त्यात हेल्दी पदार्थ सेवन करा. कार्ब्स आणि प्रोटीनची मात्रा संतुलित ठेवा.

5 घाईघाईत नाश्ता करणे
अनेक लोक रोजच घाईघाईत नाश्ता करतात. हे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे लक्ष डियव्हर्ट होते आणि तुम्ही जास्त कॅलरीचे सेवन करू शकता.

6 फायबरकडे लक्ष ठेवा
नाश्त्यात असे पदार्थ सेवन करा, ज्यांच्यामध्ये फायबर असते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. खुपवेळ पोट भरलेले राहते.

7 हेल्दी फॅट न घेणे
नाश्त्यात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यांच्यामध्ये हेल्दी फॅट आढळते. तेलात बनवलेल्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट आढळते. ज्याप्रमाणे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन शरीरासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे फॅटसुद्धा आवश्यक आहे. यासाठी नाश्त्यात अक्रोड बटर, बी, एवोकाडो, किंवा साधे दही यांचा समावेश करा. यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल.