Healthy Liver | यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 आरोग्यदायी पदार्थ आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. जर यकृत निरोगी (Healthy Liver) असेल तर आपण पोटाशी संबंधित अनेक समस्या टळू शकतात. यकृत आपल्या शरीरात अन्न पचवण्यापासून ते पाचनशक्ती सुधारण्यापर्यंत आणि पित्त तयार करण्यापर्यंत मदत करते. मात्र, आपल्या काही सवयींमुळे यकृत व्यवस्थित काम करू शकत नाही (Liver Health). आजची जीवनशैली आणि आहाराचा (Lifestyle And Diet) आपल्या यकृतावर सर्वाधिक परिणाम होतो (Healthy Liver). काही नैसर्गिक आरोग्यदायी पदार्थांच्या मदतीने यकृत निरोगी ठेवण्याचे उपाय पाहू.

 

ग्रीन टी (Green Tea) –
ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. जे लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्यामुळे शक्य असल्यास दिवसभरात किमान २ ते ३ कप ग्रीन टी पिऊ शकतात. पण रिकाम्या पोटी पिऊ नका.

 

बीट (Beetroot) –
बीटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीन (Flavonoids and Beta Carotene) असतात. बीटरूट यकृत आणि रक्त दोन्ही साफ करण्यास मदत करते. बीटरूटचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते (Consumption Of Beetroot Is Beneficial For Health).

 

गाजर (Carrot) –
यकृत निरोगी (Healthy Liver ) आणि स्वच्छ ठेवण्यासाठी गाजर खाणे खूप महत्वाचे आहे. गाजरात ग्लूटाथिओन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक द्रव्ये (Glutathione, Vitamin-A, Vitamin-C, Magnesium And Nutrients) भरपूर प्रमाणात असतात.

कांदा (Onion) –
अन्नाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही कांदा फायद्याचा आहे. यात सल्फर, अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Sulfur, Antibacterial, Anti-Viral, Anti-Inflammatory Properties) आहेत. या सर्वांमुळे यकृत निरोगी आणि स्वच्छ होण्यास मदत होते.

 

लसूण (Garlic) –
लसूण हे डिटॉक्स करण्यासाठी आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे.
लसूणमध्ये असलेल्या अ‍ॅलिसिन अँटीऑक्सिडंट्समुळे (Allicin Antioxidants) शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर काढणे सोपे जाते.

 

लिंबू (Lemon) –
सॅलडमध्ये किंवा डाळीत लिंबू पिळून तुम्ही अनेक वेळा खाल्ला असेल. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी सह नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट्स असतात,
जे शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर टाकण्यास तसेच पाचनशक्ती (Digestion) वाढविण्यास मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Liver | include these 5 types of foods in diet to keep liver healthy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

 

Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

 

Liver | ‘या’ सवयींमुळे होत यकृत निकामी, जीवनशैलीत बदल करा नाहीतर आजारी पडाल