CAA वरील 144 याचिकांवर आज ‘सुनावणी’, SC च्या कामकाजावर संपूर्ण देशाचे लक्ष

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकता सुधारणा कायद्याला (सीएए) आव्हान देणाऱ्या 144 हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. सीएए विरोधात देशभर आंदोलने अजूनही सुरु असून संपूर्ण देश त्यामुळे ढवळून निघाला आहे. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या याचिकांमध्ये प्रामुख्याने नागरिक सुधारणा कायद्यामुळे संविधानाच्या मुलभूत संरचनेला धक्का बसला आहे. त्यात समानतेचा अधिकार या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. धर्माच्या आधारे कोणालाही नागरिकता देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असे आक्षेप घेण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या विषयावर केंद्र सरकारला नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागविले आहे. एनपीआर आणि एनआरसीवरही सुनावणी होणार आहे. या 144 याचिकांमध्ये प्रामुख्याने जयराम रमेश, इंडियन युनियन मुस्लिम लीग, जमीयत उलेमा हिंद, असुउद्दीन ओवेसी, डीएमके आणि महुआ मोइत्रा यांचा समावेश आहे.

याचवेळी न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या संविधान पीठासमोर ३७० कलम हटविल्याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –