Heart Disease | ‘या’ साध्या सवयींमुळेही हृदयरोगाचा धोका वाढतो; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या आजारांच्या धोक्यामध्ये वाढ झाली आहे, त्यात हृदयविकार (Heart Disease) हा एक आहे. जीवनपद्धती-आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे (Lifestyle-Diet And Physical Inactivity) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगांचा धोका वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात जेवढे विविध आजारांनी मृत्यू होतात, त्यात हृदयरोगी दुसर्‍या स्थानावर आहेत. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी दक्षताा घ्यायला हवी. चरबीयुक्त आहार, तेल,मसाल्यांचे जास्त सेवन आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगाचा धोका (Heart Disease) खुप पटींनी वाढतो.

 

हे झाले खाण्यांच्या सवयींबाबत. दररोजच्या अ‍ॅक्टीव्हिटींमुळेही हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. दररोज कळत-नकळत आपण सर्वजण अशा अनेक गोष्टी करतो, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर (Heart Health) होतो. सहसा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु दीर्घकाळापर्यंत, या बाबींचा परिणाम हानिकारक ठरू शकतो (Heart Disease).

 

डीजिटल मीडियाच्या सवयी घातक (Digital Media Habits Dangerous) –
मोबाइल-कॉम्प्युटर स्क्रीनवर घालवलेल्या वेळेला स्क्रीन टाइम म्हणतात. पण ही वेळ वाढणं हानीकारक ठरू शकतं. सहसा, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे डोळा आणि झोपेशी संबंधित समस्या निर्माण होतात. परंतु त्याच्या प्रभावामुळे आपल्या हृदयाचे नुकसान देखील होऊ शकते. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे नैसर्गिकरित्या दीर्घकाळ बसणे, निळ्या प्रकाशाचा संपर्क, झोप कमी होणे आणि शारीरिक निष्क्रियता यांचा धोका वाढतो ज्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

एकटेपणाचा धोका (Danger Of Loneliness) –
एकांत आणि एकटेपणा या दोन वेगळ्या परिस्थिती आहेत. एकांताच्या अवस्थेमुळे तुम्हाला शांतता जाणवते, तर एकाकीपणाचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. लोकांना न भेटणे किंवा बोलणे, स्वत:मध्ये हरवून जाणे यामुळे नैराश्य निर्माण होते. काही वेळा उच्च रक्तदाब देखील वाढून त्याचा थेट परिणाम हृदय व रक्तवाहिन्यावर होऊ शकतो.

 

अधिक व्यायाम हानिकारक (Excessive Exercise Harmful) –
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. पण तो जास्त प्रमाणात होत नाहीना हे पाह्यला पाहिजे. खूप जास्त किंवा खूप कमी व्यायाम दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. व्यायाम न केल्याने शारीरिक निष्क्रियता वाढते, अति व्यायामामुळे हृदयावरील अतिरिक्त दाब वाढतो, या दोन्ही परिस्थितींमुळे तुम्ही हृदयरोगाचे शिकार होऊ शकता. ते टाळण्यासाठी मर्यादित व्यायामाची खात्री करा.

वाढत्या ताणाचा हृदयावर परिणाम (Effect Of Increasing Stress On Heart) –
नातेसंबंधांमधील चढ-उतार आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवता त्यांचा आपल्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे परिणाम होऊ शकतो.
आपले पालक, मित्र किंवा प्रेम संबंधांमध्ये काही प्रकारचे अंतर असणे देखील आपल्या हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम करू शकते.
या परिस्थितीत, आपण अधिक विचार करतात, त्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब वाढतो. दीर्घकाळ टिकणार्‍या या समस्येमुळे हृदयविकाराचा झटकाही (Heart Attack) येऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Disease | how to get good cardiovascular health things that affect heart health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga For Arthritis Patients | सांध्यातील वेदना-दाह कमी करण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रभावी; जाणून घ्या

 

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

 

Cobra Pose Yoga Benefits | ऑफिसला जाणार्‍यांनी भुजंगासनाचा नक्की करावा सराव, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?