पुण्यात उष्णतेची लाट ओसरली; राज्यात ढगाळ वातावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवस पुणे शहर उन्हाच्या तडाक्याखाली होते. तापमान अधिक वाढल्याने उन्हाचा चटका कायम होता. आता मात्र पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. काल पासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाचा चटका नाहीसा झाला आहे. तर बुधवारी ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला अधिक तापमानाचा पारा ह्या २४ तासात ५.३ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३४.२ अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे.

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे सुद्धा दिसली नाही. तर दुपारनंतर काही प्रमाणात उन्हाची किरणे पडली. त्यामुळे अधिक तापमान एकूण ३ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तर कमीतकमी तापमान हे १.४ अंश सेल्सिअसने अधिक असे नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान, काही दिवस झालं शहरात उन्हाचे प्रमाण वाढत होते. वारंवार तापमान अधिक वाढत होते. यानंतर (गुरुवारी) आज ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी ४ दिवस अवकाळी पाऊस राहणार आहे. तर पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार लगतचा भाग ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

महाराष्ट्रात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, शुक्रवार (एप्रिल) महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.