काय सांगता ! होय, Honda च्या ‘या’ 7 ‘मॉडेल्स’वर 5 लाखापर्यंतचा बंपर ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. कारण होंडाने आपल्या गाड्यांच्या किंमतीवर 5 लाख रुपयांपर्यंत बंपर सूट दिली आहे. ही ऑफर होंडाच्या जवळपास सर्वच कारवर आहे. ऑफरअंतर्गत तुम्हाला लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस मिळेल.

होंडा अमेझ Honda Amaze :-
कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये होंडाची लोकप्रिय कार Honda Amaze वर 42 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. या कारवर कॅश डिस्काऊंट मिळणार नाही परंतु कंपनी या कारच्या खरेदीवर 5 वर्ष फ्री अ‍ॅक्सिडेंटल वॉरंटी (जवळपास 12 हजार रुपये) आणि कार एक्सचेंजवर 30 हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त डिस्काऊंट देत आहे. अमेजमध्ये तुम्हाला 1.2 पेट्रोल आणि 1.5 चे डिझेल इंजिन मिळेल.

होंडा जॅझ Honda Jazz :-
या कार खरेदीवर तुम्ही 50,000 रुपयांपर्यंतची बचत करु शकतात. या कारवर 25 हजाराचे कॅश डिस्काऊंट आणि कार एक्सचेंजवर 25 हजार रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंट मिळेल.

डब्ल्यु आर – व्ही WR-V :-
या कारच्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनच्या पर्यायात 45 हजार रुपयांची सूट मिळेल. 25 – 25 हजाराचे कॅश डिस्काऊंट मिळेल आणि एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. ही कार चालवताना SUV चालवण्याचा अनुभव येतो.

होंडा सिटी – Honda City :-
ही होंडाची सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारवर तुम्हाला कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस मिळून 72 हजार रुपयांचा लाभ मिळेल.

होंडा बीआरव्ही – Honda-BRV :-
होंडाच्या आणखी एका मोठ्या कारवर शानदार ऑफर्स मिळत आहेत. ही 7 सीटर SUV ऐवजी MPV चा जास्त फील देते. जर तुम्ही बीआरव्ही खरेदी करु इच्छित असाल तर या कारवर तुम्हाला 1.10 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळू शकते.

होंडा सीआर – व्ही – Honda CR-V :-
मागील वर्षी ही फिफ्थ जनरेशन कार भारतात लॉन्च करण्यात आली होती. या कारच्या Diesel AWD model वर 5 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट देण्यात येत आहे. जर तुम्ही 2WD (व्हील ड्राइव्ह) diesel model खरेदी करु इच्छित असाल तर चार लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट मिळू शकते. Honda CR-V 1.6-लीटर आणि 2.0-लीटर इंजिनसह येते. जी क्रमश: 120hp आणि 154hp ची पॉवरमध्ये आहे.

होंडा सिव्हिक – Honda Civic :-
होंडाची प्रिमियम सेडान कार सिव्हिकवर 2.5 लाख रुपयांपर्यंतची बंपर सूट मिळत आहे. ही ऑफर 2019 च्या मॉडेलवर उपलब्ध आहे. या ऑफर 2019 च्या मॉडेलवर आहेत. ऑफरची माहिती मिळवण्यासाठी होंडा डिलरशीपशी संपर्क करु शकतात. तसेच होंडा कार इंडियाच्या https://www.hondacarindia.com/offers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.