बिबवेवाडी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे ए. आर. इव्हेंट या संस्थेने आयोजित केलेल्या दांडिया मुळे संपुर्ण बिबवेवाडी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नियोजनापेक्षा दांडियाचे दुपटीहून अधिक पासेसची विक्री केल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाली होती. यापैकी अनेक युवक युवती मोटारी घेऊन आल्याने अगदी 2 – 3 कि.मी.  पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांसोबत शहरातून बिबवेवाडीकडे निघालेल्या चाकरमान्यांना झाला.

ADV

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01eddf8b-cf06-11e8-b2eb-33bb66979b5b’]

बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे ए. आर. इव्हेंट या संस्थेने दांडियाचे आयोजन केले होते. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच युवक – युवतींनी येथे हजेरी लावली होती. शहराच्या विविध भागातून मोटारी घेऊन आलेल्या या तरुणाई मुळे यश लॉन्स कडे जाणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा येथील श्री गणेश चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. अशातच अनेकांनी त्यांच्या मोटारी बिबवेवाडी मुख्य रस्त्यावरच पार्क केल्या होत्या. तर बिबवेवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने अनिकेत सोसायटी समोरील पदपथ ठेकेदारांची वाहने आणि कोठीने व्यापलेले असतात. तर बिबवेवाडीहुन पुष्प मंगल कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या अर्ध्याच रस्त्याचा वापर होत आहे. कार्यक्रम स्थळावरून गणेश चौकात येणाऱ्या मोटारींमुळे चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

[amazon_link asins=’B075ZW7C9S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0bc4a4cb-cf06-11e8-975c-75e987fdd8fc’]

चौकात केवळ दोनच वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत होते. तर लॉन्स कडे जाणाऱ्या सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक अगदी हवालदिल झाले होते. घराकडे जाता येत नसल्याने अगदी महिला ही गाडीतून उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

९७ जणांनी केले ११७१ वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन

या कार्यक्रमासाठी दोन हजार पासेसची विक्री केली जाणार होती. परंतू त्यापेक्षा दुप्पट गर्दी जमली होती. त्यामुळेच नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आणि वाहतुकीची कोंडी झाली, असे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. या कार्यक्रमाला परवानगी देताना पोलिसांनीच खातरजमा केली नाही किंवा आयोजकांनी पोलिसांना ऍडजस्ट केले असणार, असा आरोप संतप्त नागरिक करत होते.