home page top 1

मला तर वाटत हायवेवर हेल्मेट सक्ती असावी : खासदार गिरीश बापट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे शहरातील जे दुचाकी चालक ट्रिपल सीट, बेभान गाडी चालविणे आणि ड्रिंक करून चालविणे. अशावर वाहतुक पोलिसानी कारवाई करावी. पण सध्या शहरातील अनेक चौकातील पोलिस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती असावी. अशी भूमिका पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी मांडली. पुणे शहरातील प्रत्येक चौकात वाहतुक पोलीस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई केली जात आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

पुणे शहरात वाहतुक पोलीसांकडून १ जानेवारी पासून जे दुचाकी चालक विना हेल्मेट गाडी चालविताना आढळत आहे. अशा वर दंडात्मक कारवाई करीत आहे. या कारवाईला शहरातील अनेक संघटनांनी विरोध देखील दर्शविला होता. हेल्मेट कारवाई रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. यावरून लोकसभा निवडणुकी दरम्यान शहरात चांगलेच राजकारण तापले होते. तर या निवडणुकीत पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हेल्मेट कारवाई बाबत पुणे शहरातील जे दुचाकी चालक ट्रिपल सीट, बेभान गाडी चालविणे आणि ड्रिंक करून चालविणे. अशावर वाहतुक पोलिसानी कारवाई करावी.

पण सध्या शहरातील अनेक चौकातील पोलिस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती असावी. अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रश्नावर पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

Loading...
You might also like