Hemant Rasane | शनिवार वाडा परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी द्या – हेमंत रासने

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळवून देण्यासाठी हेमंत रासने यांचा पाठपुरावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hemant Rasane | ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या १०० मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळण्याचा विषय गेली बरेच वर्षे प्रलंबित असून हा विषय मार्गी लागावा यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या विधेयकास मंजुरी मिळावी यासाठी रासने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनाद्वारे मध्यवर्ती भागातील नागरिकांसाठी महत्वाचा असणारा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. (Hemant Rasane)

या निवेदनात रासने यांनी म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अनेक वास्तू असून त्यांच्या १०० मीटर परिसरात बांधकाम आणि दुरुस्तीला पूर्णतः बंदी आहे. तर १०० ते ३०० मीटरच्या परिसरात पुरातत्त्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊन बांधकामांना परवानगी घ्यावी लागते. पुरातत्त्व विभागाच्या १९९२ च्या अधिसूचनेनुसार २०१० मध्ये केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे शनिवारवाडा (Shaniwar Wada) परिसरातील हजारो मिळकतींना फटका बसत आहे. या भागामध्ये अनेक जुन्या इमारती आणि वाडे मोडकळीस आले असून नागरिकांना धोकादायक परिस्थितीमध्ये रहावे लागत असल्याने त्यांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. (Hemant Rasane)

२०१८ साली पुरातत्त्व विभागाच्या ‘एएमएएसआर’ कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकसभेत या विधेयकाला मान्यता देखील मिळाली. परंतु राज्यसभेत मान्येतेपूर्वी खासदार श्री. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वेळोवेळी बैठका पार पडून त्याचा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला, मात्र त्यावर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सदनातून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी सुधारित विधेयकाला मंजुरी मिळणे गरजेच आहे, असे रासने यांनी म्हंटले आहे.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी
केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रासने यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल