येथे मुलींचा जन्मानंतर कापला जातो गुप्त भाग

वृत्तसंस्था – अनेकदा आपण ऐकत असतो की, आमुक आमुक देशात किंवा आमुक आमुक शहरात काही विचित्र परंपरा आहेत. खूपदा या दुनियेत मुलींना घेऊन खूपच वेगवेगळ्या प्रथा असल्याचं आपण पाहत असतो. जगातील अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे मुलींसोबत अनेक त्रासदायक गोष्टी केल्या जातात. आजही आपण अशाच एका विचित्र प्रथेबाबत माहिती घेणार आहोत. ज्यात मुलींचे अभिन्न अंग कापले जाते.

याच प्रकाराला खतना असं म्हटलं जातं. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही परंतु हे खरे आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार भारतातही आढळून येतो. तुम्हाला माहीत नसेल परंतु बाेहरा नावाच्या समाजात अजूनही या प्रथेचे पालन केले जाते. महिलांसोबत केल्या जाणाऱ्या या प्रथेला खतना किंवा महिला सुन्नत असेही संबोधले जाते. तुम्हाला वाचून धक्का बसेल परंतु तब्बल 20 करोड पेक्षा जास्त महिलांचा खतना करण्यात आला आहे. काही देशात तर याला कायदेशीर मान्यतादेखील आहे. तर काही देशात हे कायद्याच्या विरोधात आहे असंही मानलं जातं. परंतु याचा काही लोकांवर मात्र काहीच परिणाम होत नाही असेही पाहायला मिळते.

या प्रथेचे पालन मुखत: यमन, इराकी कुर्दिस्तान आणि इंडोनेशिया आदी अफ्रिकी देशात करण्यात येते. काही ठिकाणी ही गोष्ट उजेडात येत नाही परंतु लपून या प्रथेचे पालन केले जाते. परंतु ज्या देशांमध्ये या प्रथेचे पालन केले जाते तेथील लोकांचं असं म्हणणं आहे की, ‘ज्या मुलींचा खतना केला जात नाही त्या मुली आपल्या भावनांवर आवर घालू शकत नाही. शिवाय यामुळेच ती लग्नाआधीच अनेक पुरुषांसोबत संबंध प्रस्थापित करते. याऊलट ज्या मुलींचा खतना केला जातो ती आपल्या भावना कंट्रोल करू शकते.’

अशा प्रकारे जगातील अनेक देशांत अनेक चित्रविचित्र रुढी किंवा परंपरा पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर संबंध प्रस्थापित करणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. असे असताना प्रायव्हेट पार्ट कापणे आणि संबंध प्रस्थापित करणे किंवा न करणे याचा शास्त्रीयदृष्ट्या काही संबंध खरंच आहे का असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे.