High Cholesterol | हृदयाच्या आजारापासून वाचायचे असेल तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 4 गोष्टी, एक्सपर्टने केले सावध; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol | आहार चांगला असेल तर शरीर दीर्घकाळ आजारांपासून सुरक्षित राहते. खाण्यापिण्याशी संबंधित अनेक चुका शरीराशी संबंधित काही समस्या वाढवण्याचे काम करतात. हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) हा एक आजार आहे जो थेट आहाराशी संबंधित आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) वाढल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा (Heart Disease And Stroke) धोकाही वाढतो.

 

डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, जगातील एक तृतीयांश लोकसंख्येमध्ये हाय कोलेस्ट्रॉलमुळे कोरोनरी धमनी रोग (Coronary Artery Disease) होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांच्या मते, हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) असलेल्या काही गोष्टी अजिबात खाऊ नयेत.

 

1. रेड मीट (Red Meat) –
रेड मीट नेहमीच कोलेस्ट्रॉलसाठी वाईट मानले जाते. लाल मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण (Saturated Fat Level) जास्त असते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांनी लाल मांस टाळावे. मात्र, कधीकधी ते फारच मर्यादित प्रमाणात खाल्ले जाऊ शकते. जर तुम्ही रेड मीटच्या जागी सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल कमी असलेले प्रोटीन, जसे की चिकन, मासे आणि बीन्स घेतल्यास ते चांगले ठरेल.

 

2. प्रासेस्ड मीट (Processed Meat) –
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी प्रोसेस्ड मीट अजिबात खाऊ नये. प्रोसेस्ड मीटमध्ये चरबीयुक्त भाग वापरतात. त्यात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart Health) चांगले नसते. विशेषत: ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, प्रक्रिया केलेले मांस त्यांचे अधिक नुकसान करू शकते.

3. बेक्ड फूड (Baked Food) –
लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुकीज, पेस्ट्रीसारख्या गोष्टी खूप आवडतात. या गोष्टी बनवण्यासाठी भरपूर लोणी आणि साखर वापरली जाते जी शरीरासाठी अजिबात चांगली नाही. विशेषत: अशा लोकांमध्ये ज्यांचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. यामुळे जास्त धोकादायक आजार होऊ शकतात.

 

4. फ्राईड फूड (Fried Food) –
प्रत्येकाला कुरकुरीत तळलेले पदार्थ खायला आवडतात. तज्ज्ञांनी लोकांना तळलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. ते सांगतात की तळलेले पदार्थ कॅलरी काऊंट वाढवतात. पदार्थ तळण्यासाठी आरोग्यदायी तेल किंवा एअर फ्रायरचा वापर करावा.

 

या गोष्टी लक्षात ठेवा (Remember These Things) –

आहारासोबतच तुमची शारीरिक हालचालही वाढवावी.

हंगामी फळे आणि भाज्या खा.

आरोग्य आतून मजबूत ठेवण्यासाठी आहारात भरपूर अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करा.

नियमित आरोग्य तपासणी करायला विसरू नका.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol | diabetes heart disease high cholesterol diet experts warn against consumption of these foods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत ‘ही’ लक्षणे, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध; जाणून घ्या

 

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 4 गोष्टी, जेलमध्ये जाण्याची येऊ शकते पाळी !

 

Cholesterol Reducing Foods | ‘या’ पद्धतीने खा लसूण, एकाच दिवसात 10% नष्ट होईल नसांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल