पुण्यातील आपटे रस्त्यावरील रॅमी ग्रँड हॉटेलमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुण्यातील आपटे रोडवरील  रॅमी ग्रँड हॉटेल मधील स्पा सेंटर येथे चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या नामांकित हॉटेल मधून एका विदेशी महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही 27 वर्षीय महिला  उजबेकिस्थान येथील मूळ रहिवासी आहे. या हॉटेलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून यात अडकलेल्या परदेशी महिलेची सुटका केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुटका करण्यात आलेल्या महिलेला  पैशाचे आमिष देऊन जबरदस्ती वेश्या व्यवसायात आणले होते. या प्रकरणात पोलिसांकडून  दोन जणांच्या विरोधात डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33c4a24d-9f98-11e8-81e1-131f4c1ee6a8′]
स्पा सेंटरच्या नावाखाली होणाऱ्या सेक्स रॅकेट संदर्भांत अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये अडकलेल्या महिलांची सुटका झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष देशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे आणि त्यांच्या पथकाने केली.