High Temperature in Pune | पुणेकरांना वाढत्या तापमानाचा चटका ! ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – High Temperature in Pune | राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका लागला आहे. दिवसेदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरीकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. त्याचबरोबर उन्हाने पुणेकरांची काहिली होत आहे. मागील दोन दिवस 40 अंशापर्यंत पोहचलेला पारा सोमवारी खाली आला असला तरी ढगाळ हवामानामुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. यामुळे पुणेकरांची (High Temperature in Pune) दैणा झाली आहे.

 

आगामी 2 ते 3 दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून रात्रीच्या तापमानात वाढ होणार असल्याने पुणेकरांसाठी दिवसाबरोबरच रात्र देखील उष्ण राहणार आहे.
दरम्यान, पुणे शहरात (Pune City) आज (मंगळवारी) कमाल तापमान 38.9 आणि किमान तापमान 19.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
सरासरीच्या तुलनेत हे थोडे अधिक आहे. असे असले तरी सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्मा (Heat) वाढला आहे. (High Temperature in Pune)

 

दरम्यान, पुणेकर घरापासून बाहेर पडल्यावर अंगातून घामाच्या धारा सुरू होत होत्या.
त्यामुळे दुपारच्या वेळी पुणे शहरातील रस्ते ओस पडल्याचे दिसत होते.
त्याचबरोबर आगामी काही दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून कमाल तापमान 39 व किमान तापमान 21 ते 22 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
असा अंदाज हवामान खात्याकडून Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आला आहे.

 

Web Title :- High Temperature in Pune | high temperture in pune city because unbearable due to cloudy weather

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा