हे फक्त पुण्यातच होऊ शकतं… चक्क बसथांबा गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला मिळणार बक्षिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेसमोरील एक बसथांबा चक्क चोरीला गेल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, बसथांबा शोधणाऱ्याला पाच हजार रुपयांचं बक्षीस देणारं पोस्टरही लावण्यात आलं आहे. हे पोस्टर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी लावले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो reddit युजर u/ Sudhackar यांनी शेअर केला आहे. सुधाकर यांचा reddit.com वरील हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेकडे गमतीनं पाहिलं तर काहींनी आपला राग व्यक्त केला आहे. तर काहींनी जुन्या घटनांचा उल्लेखही केला आहे. एका नेटकऱ्यानं पुणे तिथे काय उणे, अशी कमेंट केली आहे. तर @joleneann123 या युजरने हाच फोटो ट्विट केला आहे. फोटो पोस्ट करताना हसण्याची इमोजी आणि पुण्याचा बसथांबा चोरीला गेल्याचे म्हटल आहे.