हिना खाननं गायलं सुशांतच्या सिनेमातील गाणं, ‘भावूक’ झाले लोक ! व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. अभिनेत्री हिना खान हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती गाणं गाताना दिसत आहे.

हिनानं गायलं सुशांत सिंहच्या सिनेमातील गाणं

हिनानं तिच्या इंस्टा स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात हिना सुशांतच्या छिछोरे सिनेमातील खैरियत हे साँग गाताना दिसत आहे. हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. हिनाला असं पाहून चाहतेही इमोशनल झाले आहेत.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डॅमेज 2 या सीरीजमध्ये तिनं काम केलं आहे. याशिवाय तिनं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती.