‘हिंदुस्तान पेट्रोलियम’मध्ये 9 पदांसाठी 164 जागांसाठी भरती, अर्जासाठी 16 सप्टेंबर अंतिम तारीख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रोजेक्ट इंजिनियर, लॉ ऑफिसर आणि HRO सह 9 पदांसाठी 164 जागांची भरती सुरु केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठी तुम्ही hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2019 असणार आहे.

या पदांसाठी भरती –

1. मॅकेनिकल प्रोजेक्ट इंजिनियर – 63
2. सिविल प्रोजेक्ट इंजिनियर – 18
3. इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजिनियर – 25
4. इंस्ट्रूमेंटेशन प्रोजेक्ट इंजिनियर – 10
5. केमिकल रिफाइनरी इंजिनियर – 10
6. लॉ ऑफिसर – 4
7. क्वालीटी कंट्रोल ऑफिसर – 20
8. ह्यूमन रिसोर्स ऑफिसर – 8
9. फाइन एंड सेफ्टी ऑफिसर – 6

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अशी होणार निवड –
उमेदवारांची पहिल्यांदा लेखी परिक्षा होईल. त्यानंतर मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनच्या आधारे निवड करण्यात येईल.

परिक्षेचा आराखडा –
लेखी परिक्षा दोन भागात होईल, यात तुमचे जनरल अ‍ॅप्टिट्यूड आणि टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज तपासले जाईल. जनरल अ‍ॅप्टिट्यूट मध्ये इंटेलेक्चुअल पोटेंशिअल टेस्ट, टेस्टिंग लॉजिकल रिजनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन, क्वांटीटेटीव अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश याचे टेस्ट होईल.

टेक्निकल प्रोफेशनल नॉलेजमध्ये क्वॉलिफाइड डिग्री आणि ज्या पदासाठी अर्ज करत आहे याचे शिक्षण.

लेखी परिक्षेत पास होण्यासाठी जनरलसाठी Minimum qualifying Overall Marks (Domain + Aptitude) मार्क्स 60% आणि SC/ST/PWD/OBCNC साठी 54% असेल.

ग्रुप डिस्कशन मध्ये UR साठी पासिंग मार्क्स 40% आणि SC/ST/PWD/OBCNC साठी 33.33% आहे.

मुलाखतील UR साठी पासिंग मार्क्स 40% आणि SC/ST/PWD/OBCNC साठी 33.33% असेल.