Hingoli Accident News | धक्कादायक! कुटुंबाच्या भेटीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Accident News | हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अपघातात कुटुंबाच्या भेटीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर‎ राहोली‎ ‎पाटीजवळ‎ अज्ञात वाहनाने या जवानाच्या बाईकला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (16 फेब्रुवारी) रात्री‎ 8 वाजताच्या सुमारास घडली. सुनील कुमारराव खरात‎ (35, रा. मकोडी, ता. सेनगाव) असे या अपघातात (Accident) निधन झालेल्या‎ जवानाचे नाव आहे. (Hingoli Accident News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सेनगाव तालुक्यातील मकोडी येथील‎ सुनील खरात हे मागील आठ ते दहा‎ वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले‎ होते.
मागील काही दिवसांपासून ते‎ जम्मू काश्मीर येथे आपले कर्तव्य बजावत होते.
आठ दिवसांपूर्वीच ते एक‎ महिन्याच्या सुट्टीवर आले होते. काल सकाळी ते हिंगोली येथून दुचाकीवर त्यांच्या गावाकडे मकोडी‎ येथे गेले होते.
त्या ठिकाणी‎ कुटुंबातील व्यक्तींना तसेच‎ नातेवाइकांना भेटून दुचाकीने परत ते हिंगोलीकडे यायला निघाले.
मात्र हिंगोली ते नर्सी‎ नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ‎ भरधाव वेगाने‎ येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (Hingoli Accident News)

यानंतर अपघातानंतर सुनील हे रस्त्यावर जोरदार आदळले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच त्यांच्या बाईकचादेखील चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण‎ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक‎ मगन पवार,
उपनिरीक्षक संजय केंद्रे,‎ जमादार किशोर पवार यांच्या‎ पथकाने भेट देऊन पाहणी केली. या दुर्दैवी अपघातानंतर मकोडी गावावर शोककळा‎ पसरली आहे. ‎

 

Web Title :- Hingoli Accident News | a jawan who came on leave passed away in a bike accident on the hingoli to narsi namdev route

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना